Bluepad | Bluepad
Bluepad
विरह माझ्या ह्रदयाचा
संतोष अकोलकर जैतापूरकर
संतोष अकोलकर जैतापूरकर
14th Mar, 2023

Share

रोजच्या दु:खाचा आधीच भार झाला होता !
उगा सांत्वनांचा थोडा आधार मिळाला होता !!
जखमांच्या खूणा वरतून पाहिल्या तू !
चाळणी झालेल्या मनाला का छेडलेस तू !!
ठरवून टाकलंय सारे आपण दु:ख गिळायचे !
सोडशिल का माझ्या जखमांवर मीठ चोळायचे !!
आनंदाच्या ओघात तुला सर्वच सुख मिळेल!
ओघळतील जेंव्हा अश्रू संतोष तेंव्हा कळेल !!
सगळ्याच फुलांना गुलाब कोठे होता येतं !
सुकलेल्या अश्रूंना सांग कुणावर प्रेम होतं !!
सरतील अनेक वर्षे मग होईल कठीण जगणे !
छळवशील तेंव्हा मनाला काय होते माझे वागणे !!
✍️श्री.संतोष अकोलकर जैतापूरकर

1 

Share


संतोष अकोलकर जैतापूरकर
Written by
संतोष अकोलकर जैतापूरकर

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad