विषय :- अर्थ नाही जीवनाला
अंतरीच्या वेदना सांगू मी कुणाला
अर्थ नाही राहिला या जीवनाला
किती सोसावे दु:खांच्या यातनांनी
ज्वालामुखी उसळून आला वेदनांनी
छळतो एकांत हा मनी आज दाटला
अर्थ नाही राहिला या जीवनाला
मनात आठवणींनी काहूर माजवले
विरहाचे अश्रू पुन्हा ओघाळले
घाव करी अतंर्गतल्या ह्रदयाला
अर्थ नाही राहिला या जीवनाला
अहोरात्र जागून काया झिजली
अश्रूंच्या फुलांनी अर्थी सजली
खांदा नाही मिळाला आधाराला
अर्थ नाही राहिला या जीवनाला