उपक्रम (२६८)दि. १३/३/२०२३
वार सोमवार
विषय:-चित्रकाव्य,
उपक्रमासाठी स्वरचित रचना
शिर्षक:- भुक
"जगाच्या हितासाठी त्याने
माणूस जन्म घातला,
ज्याने माणुसकी जपली
त्याला माणसात देव भेटला.!!१!!
माझे माझे करूनी
उगाच करतो चिंता,
मेल्यावर मात्र आपली
आपलेच पेटवितात चिता!!२!!
सर्व मिळूनही माणसाला
मनास समाधान नाही
स्मशान असे ठिकाण आहे
तिथे कसलाच भेदभाव नाही.!!३!!
चार घर फिरलो तरी
कुणीच दिल नाही अन्न,
चितेला पुजलेले ताट
खातो भुकेच्या आकांतानं!!४!!
कचऱ्यात फेकती देवा
सोन्यासारखे अन्न,
तुच सांग देवा आता
कुठे हरवले ह्यांच माणूसपण.!!५!!
इथे जीवंतपणी माणसाला
उपाशीपोटी मारतात,
मेल्यावर त्याच्या चित्तेला
पाच पक्कवान पुजतात.!! ६!!
गरीब असो श्रीमंत
प्रत्येकाची होते राख,
माणूस असो वा प्राणी
सर्वांनाच लागते भुक.!!७!!
शिवहार सिताराम जाधव
गाव, नांदेड