**पेन्शन लागू व्हावी यासाठी मी सेवा निवृत्ती नंतर १५ वर्षे न्यायालयीन लढा दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने मला पेन्शन द्यावी असा निकाल दिला.**
🙏▪️*सेवानिवृत्तांचा सन्मान अबाधित ठेवा.*▪️🙏
* सेवा निवृत्ती नंतर "पेन्शन असावं की नसावं" हा सध्या मोठा गुंतागुंतीचा विषय झाला आहे.अफाट लोकसंख्येच्या मानाने नोकर्या नाहीत.त्यातच फक्त काही खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू आहे.नोकरीत १० वर्षे पुर्ण झाले असतील तरच पेन्शन लागू होते.नोकरी करणार्या प्रत्येकाला पेन्शन मिळावी, तसेच प्रत्येकाने वृद्धापकाळासाठी नियमितपणे बचत करावी.
* निवृत्तीनंतर पेन्शन मिळते हा हक्क असेलही पण त्याहीपेक्षा *नोकरीत असतानाच निवृत्ती वेतन योजना त्या कामगाराने/कर्मचार्यांनी स्विकारावी असते* हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे.अशा या *"अधिकृत सरकारी व्यवस्थेमार्फत"* किंवा *खासगी व्यवस्थापनाच्या नियमांनुसार* कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर मृत्यूपर्यंत पेन्शन व मृत्यूनंतर परिवाराला सुद्धा नियमांत असल्याप्रमाणे आर्थिक संरक्षण दिले जाते.
* भविष्यात स्वतःसाठी व परिवारासाठी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाने अभ्यासपूर्वक आणि स्वेच्छेने मान्य केलेले आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी *त्या कामगाराने/कर्मचार्याने नोकरीत असतानाच मिळत असलेल्या पगारातून पेन्शन निधीत नियमित रक्कम वळती केलेली असते ही गोष्ट विसरून चालणार नाही.* कर्मचार्याच्या रकमेइतकी रक्कम कंपनी/सरकारने पेन्शन व्यवस्थेत जमा केल्यावरच त्यातून तहहयात पेन्शन दिली जाते. *या व्यवस्थेला न्यायालयीन मान्यता असतांना पेन्शन दयेपोटी दिली जाते असे समजण्याची चूक कोणीही *"सरकार"* ने करु नये
लेखक:-
*सुहास सोहोनी*
*लेखसंग्रह:- उजळते क्षितिज*
(*सामाजिक विचार मंच*)
9405349354