एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुमच्याकडे क्षमता असेल,अपार कष्टाची तयारी असेल, योग्य दिशेने प्रामाणिक प्रयत्न असतील तर तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही निसर्गाचा नियमचं आहे जेवढे तुम्ही द्याल त्याच्या कैकपटीने तुम्हाला परत मिळते म्हणूनच तर जेवढी तुम्ही प्रयत्न,सातत्य,कष्ट,तळमळ यांची पेरणी करालं तेवढे यशरूपी उत्तुंग फळ मिळणार आहे आणि तुमचे इप्सित साध्य होणार आहे