Bluepad | Bluepad
Bluepad
जागो ग्राहक जागो आपली जागरूकता हेच आपल्या बचावाच प्रभावी माध्यम आहे
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
14th Mar, 2023

Share

*जागो ग्राहक जागो आपली जागरूकता हेच आपल्या बचावाच प्रभावी माध्यम आहे*
ग्राहक दिनानिमित्त एक आदर्श ग्राहक म्हणून आपण स्वतः जागृत दक्ष आणि चाणक्ष असलं पाहिजे.जागरूकता हाच आपल्या बचावाचा अंतिम उपाय असतो . कायदेशीर संरक्षण असलं तरी त्या मध्ये जाणारा प्रचंड वेळ हा परवडणारा ठरत नाही . म्हणून एक ग्राहक म्हणून आपण स्वतःला जागरूक दक्ष ठेवलं पाहिजे.दैनंदिन जीवनात आपण मिळवलेला पैसा खरेदी करण्यासाठी वापरतो . खरेदी केल्यावर एखादी वस्तू खराब ,लागली , अथवा जाहिराती मध्ये दिसली तशी नसली अथवा आपल्याला फायदेशीर ठरली नाही मग मात्र आपण ताणवात येतो . ग्राहक म्हणून शासन स्तरावर अनेक कायदे असले तरी सुद्धा आपली जागरूकता हाच आपला अंतिम बचाव आहे.ग्राहक हा सगळ्या उद्योग व्यवसाय व्यापार बाजारपेठ ह्या सगळ्यांचा केंद्रबिंदू असल्याने त्याला आकर्षित करण्यासाठी सध्या वेगवेगळे प्रभावी तंत्र वापरलं जातं.याच तंत्राचा परिणाम म्हणून आपली खरेदी करताना अथवा खरेदी केल्यावर फसवणूक होऊ नये अथवा होणारं नाही आणि आपलं आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी दक्षता एक आदर्श उत्कृष्ट ग्राहक म्हणून आपण स्वतः घेतली पाहिजे. एक ग्राहक म्हणून काळजी दक्षता घेणं हे आपलं कर्तव्य जबाबदारी पण आहे . जेणेकरून नंतर आपल्या मनात फसवणूक झालयाची भावना निर्माण होणार नाही म्हणून जागो ग्राहक जागो आपण आपल्या जीवनात दैनंदिन गरजेच्या वस्तू अथवा भविष्यातील गुंतवणूक करताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी दक्षता घेणं सध्या काळची गरज आहे.सदैव सचेत जागरूक राहुन एक जागरूक ग्राहक म्हणून आपण आपली फसवणूक टाळु शकतो. कमी वेळात जास्त नफा , अल्प मेहनती मध्ये जास्त मोबदला, अथवा चुकीची माहिती प्रसिध्द करून , आर्थिक लयलुट करणं ह्या बाबी सध्या जोरदार फोफावत आहेत.भेसळीच प्रमाण सध्या इतकं वाढत चाललं आहे कि आपण आपल्या आरोग्य सोबत खेळतोय अस कधी कधी जाणवत आहे.पैसा हा एवढा मोठा वाटत आहे कि त्यासाठी माणसं एकमेकांच्या जीवशी खेळताय .या मध्ये आपली जागरूकता हाच आपला बचाव आहे.जगो ग्राहक जागो आपली समय सुचकता हाच आपला बचाव आहे. जागरूकता हिच उत्कृष्ट गृहकाची ओळख आहे.आपली कोणीही फसवणूक करू नये इतकं जागरूक तर आपण ग्राहक म्हणून असलच पाहिजे. जसं जसं दिवसेंदिवस युग गतिमान होत आहे प्रगतीच्या दिशेने मानव आपली प्रचंड झेप घेत आहे त्याच दरम्यान त्याच प्रमाणात वेगाने फसवणूक पण वाढीस लागली आहे.मुळात गृहक हा जागृत असलाच पाहिजे.जागरूकता हाच आपला बचाव आहे . आपल्या दैनंदिन गरजा पाहता आपल्याला अनेक बाबी आवश्यक असतात तसंच दैनंदिन बाबी सोबतच आपण आपल्या आयुष्यात भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही निर्णय घेत असतो हेच निर्णय घेताना आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महणुन आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. जसं जसं लोक संख्या आणि भौतिक संसधान सुख सुविधा वाढत आहेत तसं अल्पावधीतच पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे भेसळयुक्त वस्तू पदार्थ बनविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत . अन्न पदार्थ, खाद्य पदार्थ, वस्तू,या मध्ये तर भेसळीचा शिरकाव प्रचंड प्रमाणात झाला आहे.परंतु पैसे अल्पावधीत कमविण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना,पैसे रातोरात दुप्पट तिप्पट असं काय काय आपल्या आजूबाजूला चालू असतं .याचे आपण कधी शिकार होतो हे कळत नाही.आणि नंतर पश्चात्ताप होऊन आपण मग तक्रारी वगैरे करून झालेली फसवणूक भरून कशी निघेल यासाठी प्रयत्न करतो . मुळात फसवणूक होणार नाही हि आपली मानसिकता आपण का मजबूत ठेवत नाही. याच कारण हेच आहे कि आपण जागरूक ग्राहक म्हणून स्वतःला सिद्ध करत नाहीत.आपण जर जागरूक ग्राहक म्हणून स्वतःला सिद्ध केले तर आपली सहजासहजी कोणीही फसवणूक करणार नाही अथवा आपली फसवणूक आपण टाळू शकतो.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad