Bluepad | Bluepad
Bluepad
आपल्या आजूबाजूलाच आहेत हिंस्त्र,जंगली श्वापदे
सुहास विनायक सोहोनी
सुहास विनायक सोहोनी
14th Mar, 2023

Share

💥 *आपल्या अजूबाजूलाच आहेत हिंस्त्र, जंगली श्वापदें* 💥 ----------------/-----------
★बलात्काराच्या घटना वारंवार का घडतात ? पुरुषी अत्याचाराने त्रस्त आणि भयभीत असलेली कोणत्याही वयाची स्त्री शहर वा खेड्यात कुठेही सुरक्षित नाही,काही काही ठिकाणी तर अगदी स्वत:च्या घरातसुद्धा स्त्री सुरक्षित नाही,असे का?
*कुठेतरी चूक होतेय.*
★ही विकृती का वाढीस लागतेय ! संस्कार कमी पडले का ? मनावरचा ताबा सुटतोय ! दारू व इतर व्यसनाचे प्रमाण व व्यसनींची संख्या वाढते आहे का ? ★अशा घटनांना अनेक कारणे आहेतच, पण सध्या प्रत्येकाच्या स्मार्ट फोनवर, इटरनेटवर क्षणात बघता येतील अशा *अश्लील व्हिडिओं ची रेलचेल आहे.*
* ★हे सगळे दुर्गुण जेंव्हा एकत्रित होतात तेंव्हा काय भयानक कांड घडेल, कल्पना करवत नाही. दुष्कृत्यां साठी जराशी संधी मिळाली तर मात्र, धोका प्रत्येक घरात आहे.
★ कायदा कितीही कठोर असला तरी त्याची अंमलबजावणी परिणामकारक होत नाही. गुन्हा करण्याचा विचार करताच गुन्हेगारांना धडकी भरायला हवी. गुन्हा सिद्ध होऊन त्वरित शिक्षा अंमलात आणावी.
★ अशा दुर्दैवी घटनांमध्ये सुद्धा जातीचे राजकारण होते.
★ कसे असेल भविष्य आपल्या भारतीय समाजाचे ?
शुद्धबुद्धीने विचार होईल ? ?
* *सुहास सोहोनी*
*▪️ *माझ्या संवेदना* ▪️*
(सामाजिक विचार मंच) अमरावती - ६,
मोबा : -9405349354
{विविध सामाजिक विषयांवर आधारित माझे स्तंभ लेख वाचण्यासाठी कृपया फेसबुक वर *"सामाजिक विचार मंच"* किंवा *"माझ्या संवेदना"* सर्च करा.}

0 

Share


सुहास विनायक सोहोनी
Written by
सुहास विनायक सोहोनी

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad