#bjp4maharashtra #bjp4india #bjp4satara #rajdhani #सातारकर
आज पर्यंत जितक्यादा पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली तीतक्यादा फक्त पुस्तकं आणि पुस्तकच वाचली आणि प्रचंड आनंद मिळवला. तरीही पुढच्या वेळेला आले की या ठिकाणी जायचे आणि हे वाचायचे हे ठरलेले. म्हणूनच साताऱ्यातील एकमेव ठिकाण जे मला स्वतःला वाचक आणि लेखक असल्यामुळे खूप आवडते. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रशिक्षण मेळावा आयोजित केल्याचे कळले. त्यासाठी आमंत्रणही दिले गेले. आता माझ्या मधल्या वाचकाला आणि लेखकाला त्या गावात असलेल्या या मेळाव्याला न जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. पण दरवेळेला गाडी कोणत्यातरी स्पॉटला थांबवून पूर्ण दिवस ज्या गावात जेवण खाणं नसले तरी हरवून जायला व्हायचे. कोणाही जवळच्या मैत्रिणीला पुस्तकांच्या गावी जाऊ म्हटले की ती माझ्या या वाक्याला वैतागणारच कारण "तिथे गेलीस की तिथल्या मावशीना चहा सांगायचा सटरफटर नाश्ता करून पूर्ण दिवस त्या पुस्तकांमध्ये बुडून जायच आम्हाला नाही यायचं." मग माप्रो गार्डन ला जाऊ असे सांगून कितीदा तरी या पुस्तकांच्या गावात दिवस घालवला आहे. अश्या त्या गावातील पुस्तकांचा रस्ता बाजूला करत थोड्या रुखरुखत्या मनाने जन्नी माता मंदिराच्या सभागृहात दोन्ही दिवस पोहोचले होते. पहिलीच वेळ अशी असेल ज्या वेळेला पुस्तकांच्या गावात भिलारला आले असेल आणि एकही पुस्तक वाचलं नसेल. ही खंत जरी असली तरी या ठिकाणी अनेक चालते बोलते पक्षासाठी वाहून घेतलेले विचारवंत पुस्तके ऐकायला मिळाली. त्यामुळे दोन दिवस पुस्तकांच्या गल्लीतून जाऊन ही पुस्तके वाचायला मिळाली नसली तरी खूप सारे विचार ऐकायला मिळाले आणि विशेष म्हणजे ज्या जमिनीवर ज्या मातीवर असंख्य पुस्तकांचे अस्तित्व होते त्या अस्तित्वा मध्ये थांबण्याचा योगही आला. नियोजन टीमचे खूप खूप आभार विशेषतः भा ज पा जिल्हाध्यक्ष मा श्री जयकुमार जी गोरे यांचे विशेष आभार..🙏
© सिध्दी पवार सातारा