Bluepad | Bluepad
Bluepad
जिवनातील सत्य .कर्माप्रती प्रामाणिक असणे ..
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
13th Mar, 2023

Share

जिवनात अनेकदा माणसाला नाराज होतानाच , अनेक काही प्रसंगांत स्वःताला आनंद सुध्दा मिळत असतो , ज्याला आनंद मिळविण्यासाठी कुणाकडेही मागायची गरज नसावी . स्वताचे मनोबल सक्षम असेल सोबतच स्वताचा आत्मविश्वास पक्का असेल तरच हे प्राप्त करता येतं . आणि जेव्हा आपण जिवनात पैसा संपत्ती धन मिळविताना जेवढी संपत्ती आपण मिळवली त्यात पुण्यकर्म किती मोठे आहे , हे सुद्धा विचारात घेतले पाहिजे , अनेकदा संपत्ती मिळविणारे गैरमार्गाने भ्रष्ट आचरणाने संपत्ती मिळविली , आणि आता माझ्याजवळ भरपुर संपत्ती आहे . मी आता काही पुण्यकर्म केले पाहिजे, हा विचार घेऊन पुढे जात असेल व भरपूर दान धर्म करीत असेल तर ते पुण्यकर्म नाही , हे तर स्वताच्या पापाला पांघरूण घालण्याचे कार्य होय . यात पुण्यकर्म मिळविण्यापेक्षा प्रसिध्दीचा दुसरा सुवास अधीक असतो . आणि जो जिवनात प्रामाणिक कर्म , मेहनतीने , कष्टाने , कमाविले , ज्याच्या अंतरंगात अंतर्मनात स्वताच्या फायदा स्वार्था साठी न विचार करता जो लोकांच्या हिताचा अधिक विचार करता, आपल्या कर्तव्यात व्यवाहारात , व्यवसायात किती लोकांचे भले होईल , कुणाचे मन दुखावणार नाही . आणि कळत नकळत काही चुका झाले ते सुधारण्यासाठी प्रामाणिक मनःपुर्वक पश्चाताप करीत , काही चांगले कर्म कर्तव्य करीत पुढे जातो , भुतकाळात आपले अज्ञानामुळे बरेच काही चुकीचे घडले , मला आज जे वर्तमानकाळात चांगले कर्माची जाणीव होते आहे ही परीपक्वता मला मागील काळात का कळली नाही , हा उदात्त हेतु ठेवून पुढे जातो तो नक्कीच स्वताला सुधारण्यासाठी समोर वर्तमानकाळात पुण्याईस पात्र आहे . यापैक्षा भुतकाळात आपल्या कडून घडवलेले किंवा घडलेले चांगले कर्माचे फलीत हे वर्तमानकाळात सिध्द होत असते . मागील पुण्यकर्मच भविष्य काळात कामात येत असतात . अशा माणसांना आपोआपोच निसर्ग कृपेने , दैवी शक्तीने पुण्याईचे फलीत मिळत असतात . त्यासाठी त्याला मी पणाचे पांघरूनाची गरज नसते . त्यांचे प्रामाणिक मन , प्रामाणिक कर्तव्य , प्रामाणिक काम व कार्य यातूनच पुण्य संचय मिळत असते . त्यासाठी कोणत्याच प्रसिध्दी ची गरज नसते. तर ती चर्चा कुठल्याही प्रसिध्दी शिवाय आपल्या पुण्यकर्माचे झोळीने भरत असते . ज्यांना सर्व काही बरोबर असुन जिवनात दुःख , अनेक कार्यांत अडचणी ,समस्याना समोर जावे लागते . ते नक्कीच जिवनात पुण्यकर्मापेक्षा पापकर्माचेच वाटेकरी अधीक असतात .हे त्यांना इतरांना सांगण्याची काही गरज नसावी . किंवा बरेच काही समजण्याची आवश्यकता असते . यांचे ऊतर त्यांचें स्वताचे अंतर्मनच अधिक चांगले देऊ शकतं. जगात बरेच जणं याकरीता अधीक दुःखी नाही की त्यांना काही बाबींची कमी आहे . तर याऊलट दुःखी यासाठीच आहे की त्यांची विचार करण्याची क्षमता ही नकारात्मक असते . यासाठीच जिवनात सकारात्मक विचार झालाच जिवनात आनंद समाधान समृध्दी मिळवून देण्यास प्रभावीपणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते व निर्णयाप्रत पुढे जाण्यास कामात कार्यात पुढे नेत असते . दुःखात आनंद सुख शोधणे , नुकसानात फायदा शोधणं , जिवनात असं कोणतेही मोठे दुःख नाही की त्यांनी सुखाची प्रतिसावली बघीतली नाही .अनेक उदाहरणे प्रसंग असे असतात कि त्यामुळे आपण प्रेरणा प्राप्त करू शकतो , प्रेरणास्थानी असु शकतो . रस्त्यावरील दगडाला अनेकदा ठेच लागुन मार बसतोय पडतो , परंतु तेच दगड मंदीरात पायरीला जेव्हा बसते तेव्हा आपणच नतमस्तक होत असतोत .म्हणुनच म्हणतात देव अंतर्गात शोधा हे. त्याच दगडातुन जेव्हा देव साकारतो तेव्हा श्रद्धापूर्वक दर्शन घेतले जाते . म्हणुनच देव कुठे असेल तर तो माणसाच्या अंतर्गातच दडलेला आहे .जिवनातील सकारात्मक दगडाला आपण जिवनाची पायरी बनवून संपत्ती सोबतच पुण्य कमविण्याचा पुण्य निश्चय व पुण्य संकल्प करता आला पाहिजे व ठरविता येणे अधिक पुण्यास पात्र असतो . हे भविष्यात हेच पुण्यसंचय , पुण्य संकल्प जगण्यास मनोबल मोठे करीत , शुन्य चिंतेपासुन मुक्त करीत आनंदाने सुखाची झोप व समाधान मिळत असते . त्याकरीता समोरच्या माणसांच्या भावनांचा अभ्यास समजायला पाहिजे . आणि या गोष्टी ज्यांना कळत नसेल समजावून सांगायची गरज पडत असेल तर सुशिक्षित सुसंस्कृत ज्ञानी पुरुषांपेक्षा अशिक्षित ज्याला आपण अडाणी समजतो तो जर भावना उत्तम समजत असेल तर तो खरोखरच सुशिक्षित सुसंस्कृत ज्ञानी माणसापेक्षा कितीतरी समजदार मानायला हरकत नसावी . दुसर्याच्या हिताचा विचार करणारा माणुस नेहमीच अधीक परीश्रमास समोर जावे लागते . कारण काय तर फळ देणार्या वृक्षालाच अधिक दगडांचा मारा सहन करावा लागतो . जो अंतर्मनाच ऐकतो तोच यशस्वी होत असतो . सावरत असतो . कोण म्हणतात परमेश्वर दिसत नाही , जेव्हा कोणीच दिसत नाही तेव्हा परमेश्वरच दिसत असतो ,तो कोणत्या ना कोणत्या स्वरुपात दिसत असतो .तिनं प्रकारे आपण जिवनात यशस्वी होऊ शकतो . एक चिंतनातून आपण ज्ञानी बनु शकतो. दुसरं चांगले आचरण वर्तनांच अनुकरण आणि तिसरे म्हणजे आपणास आलेले चांगले वाईट अनुभव .
🌹🙏 धन्यवाद नमस्कार . जय श्रिकिष्ण , जय श्रीराम 🙏🌹

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad