वर्ल्ड पार्लमेंट तर्फे १९ मार्चला " आई " या विषयावर अनोखे काव्य संमेलन
श्रीरामपूर : -
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधान व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने स्व. सिंधुताई विघावे यांच्या स्मृती प्रित्यर्थ " आई " या विषयावर एक अनोखे आंतरराष्ट्रीय काव्य संमेलन येत्या रविवारी, १९ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
ग्रामिण व शहरी भागातील कवी / कवयत्रींसाठी एक मोठया दर्जाचं व्यासपिठ मिळवून देण्याचा उदात्त उद्देश वर्ल्ड पार्लमेंटचा आहे. त्यासाठी "आई " या विषयावरील स्वरचित कविता संबधित कवींना सादर करण्याची संधी मिळणार आहे. तरी आपले नाव निश्चित करण्यासाठी ९०९६३७२०८२ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.
याच कार्यक्रमात डब्ल्यूसीपीएच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पोएट्री अवॉर्ड २०२३" देण्यात येणार आहे. त्यामध्ये
प्रा.डॉ. मेधा इंद्रकांतराव गोसावी
बीड यांना प्रथम, श्री.प्रशांत शंकर भोसले पीएमपीएमएल - पुणे यांना द्वितीय,
डॉ. प्रतिभा भारत पैलवान - गुरुकन्नन नगर, इचलकरंजी यांना तृतीय, श्री.अशोक महादेव मोहित - बार्शी, जिल्हा-सोलापूर यांना चतुर्थ, तर सौ.शशिकला गणपत गुंजाळ, वांगी बी.के. तालुका - भूम,
जिल्हा- उस्मानाबाद यांना पाचव्या क्रमाकांचे पारितोषिक मिळणार आहे.
याच कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्यासाठी काही मान्यवरांना " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल क्लायमेट एमिसरी अवॉर्ड २०२३ " तसेच इतर सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय सेवेसाठी " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२३ " हा डब्ल्यूसीपीएचा सर्वोच्च पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती.डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे.