Bluepad | Bluepad
Bluepad
संपर्काची साधनं वाढली असली तरी देखील नात्यांमधील संवाद मात्र संपुष्टात येत आहे
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
13th Mar, 2023

Share

*संपर्काची साधनं वाढली असली तरी देखील नात्या मधील संवाद मात्र संपुष्टात आला आहे*
कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध हे संवादावर टिकुन असतात.संवाद हा मानवी नात्यांचा आत्मा आहे.हाच आत्मा संपर्काची साधन नसताना मजबूत होता. ज्या प्रमाणात तंत्रज्ञान युग प्रगत होऊन दळणवळण संपर्काची साधन वाढली आहेत.आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. त्याच प्रमाणात मानवी नात्या मधील संवाद सुद्धा वाढण अपेक्षित होतं. पण तसं चित्र सध्या तरी दिसत नाही .असं खेदानी म्हणावं लागतं आहे.संपर्काची साधनं दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढण हे जरी प्रगतीच लक्षण असल तरी सुद्धा त्याच प्रमाणात नात्यातील मधील संवादांची सुद्धा प्रगती होण गरजेच आहे.वाढत असलेल्या संपर्का साधना मुळे आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात अथवा जगातील कोणत्याही देशात अगदी क्षणात म्हणजे काही तासांच्या आत पोहोचु शकतो .एवढं तंत्रज्ञान प्रगत झालं ,बस, रेल्वे, खाजगी वाहन , विमान सेवा , झपाट्याने वाढत आहे. तसेच भ्रमणध्वनी क्षेञातील प्रगती तर कल्पना शक्ती पलिकडे आहे. आपण सेंकादांत कोणाशी कोठेही बोलु शकतो .समोरा समोर बोलु शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दळणवळणाची साधनं दिवसेंदिवस प्रगती करत आहेत तसं तसं जग जवळ येत आहे.पण जसं जसं जग जवळ येत आहे .तसं तसं आपलेपणाची भावना नात्यातील संवाद मात्र दुर्मिळ होत चालला आहे. जसं जसं युग बदलतं आहे तसं तसं तंत्रज्ञान झेप घेत आहे. त्याच प्रमाणात मानवी नात्या मधील संवाद देखिल कमकुवत दुबळा होत चालला आहे.हे कोणीही सहजासहजी अमान्य करू शकत नाही. तंत्रज्ञान युग हे काही अचानक आलं असं जरी नसलं तरी ज्या पद्धतीने सर्व सामान्य लोकांच्या मध्ये तंत्रज्ञानाचा प्रसार प्रचार झाला आहे.हे प्रमाण पाहता संपर्काची साधन प्रचंड प्रमाणात वाढली आहेत. मात्र त्याच प्रमाणात संवाद मात्र कमी झाला आहे.हे सत्य नाकारता येणार नाहीच.अथवा नाकारून चालणार नाही. संपर्काची साधन नसताना जी आपलुकी जिव्हळा , स्नेह अस्तित्वात होता आज तो राहिला नाही. दहा पैशाच्या पत्रावरील एक एक ओळ वाचण्यात जी आपुलकी होती .ती आज थेट आँनलाईन मोबाईल द्वारे लाईव्ह समोरा समोर पाहुण्यात सुद्धा नाही.दळणवळण साधनं नसताना नातेवाईक एकमेकांच्या कडे कित्येक दिवस मुक्कामी असत आणि नातेवाईक यांच्या कडे जाण्यासाठी कित्येक दिवस प्रवास करावा लागत असेतरी सुद्धा नात्यांमधील संवाद मजबूत होता. आज सगळं आहे क्षणात आपण आपल्या नातेवाईकांडे कोसो दुर पोहचु शकतो .पण थांबण्यासाठी वेळ मात्र कुणाकडे हि उपलब्ध नाही. दळणवळण साधन नसताना आपण कित्येक दिवस नातेवाईक आप्तेष्ट अथवा स्नेही यांच्या कडे थांबु शकत होतो . आज आपण सध्या कुठं आहेत हे लाईव्ह समजतं असताना देखिल पाहुणचार हा औपचारिकता ठरला आहे.महणजे किती मोठ्या प्रमाणात विसंवाद वाढत चाललं आहे. मग हि दळणवळण साधन वाढली याचा मानवी जीवनात उपयोग झाला आहे कि नाही. प्रथम दर्शनी जरी हे गणित उपयुक्त वाटत असलं तरी अंतिमतः सामाजिक मुल्यमापन केले तर त्याच प्रमाणात संवाद देखिल वाढण अपेक्षित आहे.तो वाढलं पाहिजे तरच आपण ज्या पद्धतीने दिवसेंदिवस तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रातील संपर्काची साधन वाढवतोय प्रगती करतोय त्याचा उपयोग आहे. सार्थकता हि मानवी जीवनात उपयोगी ठरेल.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad