प्रवास जो करत नाही, वाचनाची आवड नाही,
कानांत संगीत ज्याच्या वाजतं नाही, त्याला जीवनात
अर्थ जाणवेल का काही?
जो कधी मदत करत नाही, कुणाची मदत घेत नाही, प्रेम ज्याला माहीत नाही, जीवन जगावे कसे त्याला कळणारचं नाही.
गुलाम बनतो जो सवयींचा, चालतो एकाच मार्गाने, बदल घडत नाहीत ज्याच्या जीवनात,
रंग ज्याला भुलवत नाहीत, संवाद कुणाशी साधत नाही,
आनंद, दुःख, हास्य त्याला कळणारचं नाही, छंद जो जोपासत नाही, भावनांना आवर घालत नाही, प्रेमाची भाषा कळत नाही, हृदयाचा आवाज जो ऐकत नाही, जीवनावर प्रेम त्याचे बसणारच नाही, नोकरीत सुख मानत नाही, समाधान ज्याला माहीत नाही,
धोके स्विकारत नाही, स्वप्नांच्या मागे धावत नाही, जगावे कसे त्याला कळणारचं नाही.