तुझ्या त्या दुनियेत राजा तुला माझी आठवण येते का,
माझ्या आशा या जगण्याची व्यथा तुला दिसते का..
तसं तर प्रत्येक क्षण नकोसा वाटतो रे मला,
पण मी हरले तर नाही आवडायचं तुला..
तुझ्याशिवाय मला जिंकायचं तर नाहीये रे,
पण तुझी अधुरी स्वप्न मला मोडायची नाहीये रे...
मला माहीत नाही माझ्या अवतीभवती तू असतोस की नाही,
पण ना माझ्या मनाला तुझ्याशिवाय काही सुचतच नाही..
तू म्हटला होतास ना की तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही,
पण आता मात्र माझ्या डोळ्यात पाण्याशिवाय काही उरलंच नाही..
तु न सांगता मला दूर केलं तुझ्यापासून,
तुझ्या मनातलं गुपित लपवल तू माझ्यापासून..
स्वतःला रोज एक प्रश्न मी करते,रोज एक लढाई नव्याने लढते,
प्रेम तुझं अस हरू कसं शकलं,रोज हेच उत्तर शोधत मी रडते..
माझं काय चुकलं याच उत्तर मला नाही रे मिळत,
जिवंतपणी जळणारा जीव माझा तुला कसा नाही रे कळत..