Bluepad | Bluepad
Bluepad
❤️❤️वेड ❤️❤️
Suraj Tulave
Suraj Tulave
12th Mar, 2023

Share

आज मनात एक विचार आला ,
का समजावू मी या बावऱ्या मनाला ,
जस वाहत जातोय तुझ्यामध्ये तस जाऊदे ना त्याला,
कारण, आता फक्त तुझेच वेड लागलय माझ्या मनाला...
कधी ऊन सावलीचा खेळ तो झाला,
क्षणाचा रुसवा आणि खूप सार प्रेम ,
तुझाच विचार असतो प्रत्येक क्षणाला ,
कारण, आता फक्त तुझेच वेड लागलय माझ्या मनाला...
तु दिसली नाही तर किती व्याकुळ होत हे मन ,
आतुरता लागते तुझ्या भेटीची याला ,
आणि भेटल्यावर तुला पाहून सगळ जग विसरायलाच होत मला ,
कारण, आता फक्त तुझेच वेड लागलय माझ्या मनाला...
आता फक्त तु आणि तुझ्या प्रेमाचाच ध्यास असावा ,
जरी येतील लाख अडथळे ,
मात्र आपल्या कहाणीचा शेवट हा गोडच असावा ,
तुझ आयुष्यात येण म्हणजे खुप नशीबवान समजतो मी स्वतःला ,
कारण, आता फक्त तुझेच वेड लागलय माझ्या मनाला...
.....सुरज❤️✍️

1 

Share

Suraj Tulave
Written by
Suraj Tulave

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad