पोस्टमन
आज अचानक 1980 च्या काळात काम करणारे पोस्टमन काकांची भेट झाली.
त्यांच्या सोबतच्या संवादात काही वेगळच बघायला मिळाले.
काहो पोस्टमन काका आता इंटरनेट मुळे जग जवळ आलंय ना?? पोस्टमन काका हसून उत्तरले.....
50 रुपयाच्या money order मनी ऑर्डरसाठी
मी 5 किमी झिजयचो.....
बहिणीचे पत्र भावाला मी वेळेवर द्यायचो.....
पत्राची वाट पाहत माझ्या गाव जमा व्हायचं.....
पत्र वाचून दाखवताना संगतीला मला पण रडवायचे.....
पत्र राहायचे छोटे भावना मात्र मोठ्या.....
शब्द कमी होते.... पण अर्थ मोठे.....
चुकून जेवणाच्या वेळेवर गावात जर आलो....
बिना जेवल्याचे परत कधीच नाही गेलो.....
ताबडतोब कामासाठी वेळेच्या बाहेर पडलो...
लोकांच्या प्रेमापोटी गावोगाव फिरलो......
मोठ्यांसोबत लहानगे माझी वाट पाहत होते....
सायकलच्या घंटी ला सगळेच ओळखत होते....
माझ्या पोशखाला लोक दैवी समजायचे....
पोशाख घालून सायकल वाला आला....
म्हणत गोड बातमी ची वाट पहायचे .....
दूर बसलेल्या आपल्या माणसाचे पत्र आले
तर तुम्ही च वाचून दाखवा म्हणत
भोवती माझ्या घोळखा घालायचे.......😘,
शेवटी काका म्हणाले आता जग जवळ नक्कीच आले..... आपले मात्र दूर गेले.....