Bluepad | Bluepad
Bluepad
शुभचिंतन कृतज्ञ व्यवहार.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
12th Mar, 2023

Share

व्यवाहारात दैनंदिन जीवनात व्यापारात व्यवसायात अनेक प्रकारचे लोक माणसं भेटत असतात . अनेक ज्ञानी भेटत असतात . अनेकापैकी कामाची मोजकीच भेटत असतात . आणि एवढं असूनही जेव्हा कठीण प्रसंगी केवळ ईश्वराचेच स्मरण केले जाते . इतर सर्व मार्ग बंद असतात . ती नाती श्रेष्ठ असतात जिथे मी ऐवजी आम्ही ही भावना जोपासली जाते . विनम्रता पुर्वक आचरण व्यवहार , बोलणं एक दुसर्याची किंमत करणे , आदर करणे , कृतज्ञता व्यक्त करणे , विश्वास ठेवणे ,हे गुण ज्या माणसात आहे .तो कोणाच्याही अंतःकरणात स्थान प्राप्त करतो . शेवटी आनंद एक आभास आहे , याला जो तो शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे . दुःख एक अनुभव आहे , तो आज प्रत्येकाप्रत्येकाजवळ आहे . आणि जिवनात तोच यशस्वी आहे ज्याचा स्वतावर विश्वास आहे. सोबतच ज्या माणसाचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तो जिवनात मागे कधीच राहत नाही . उदाहरणार्थ आंधळयाला मंदीरात पाहुन लोक हसले आणि म्हणाले मंदीरात दर्शन करायला आलात काय ?आपणास परमेश्वर दिसणार त्यावर आंधळ्याने उत्तर दिले काय फरक पडतो ' मी पाहील काय नाही काय ! माझा देव तर मला दिसणार नाही , पण मी देवाला तर दिसणार . जर समस्या असेल तर ईमानदार व प्रामाणिक राहा . धन संपत्ती असेल तर साधे सरळ राहा . अधिकार पद मिळाले तर विनम्र राहा . क्रोध आला तर शांत व्हा .हेच जिवनाचे व्यवस्थापन आहे .सत्य तेव्हा नाराज ‌होतो जेव्हा चार खोटारडे एकत्र होतात .तेव्हा प्रामाणिकपणा हारतो . ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात प्रतिमा दिसत नाही , त्याप्रमाणे अशांत मन असेल आनंद मिळणारच नाही याकरीता शांततेने समस्या सोडविणे आणि आनंद मिळविणे व समाधानी जिवन जगणे हाच जगण्याचा मंत्र आहे . याऊलट अविश्वास आहे . अविश्वास मुळे कठीण पर्वतासारखे भिंती निर्माण होतात . आणि विश्वास पर्वताच्या मध्यातुन आपला रस्ता काढतो . मोठ्यांनी दिलेला आशिर्वाद आणि आपल्यांनी दिलेल्या शुभेच्छा यांचा काही रंग नसतो .परंतु जिवनात जेव्हा ते रंग भरतात तेव्हा जिवन ... हे सुंदर बनते . जेव्हा हे सर्व मजबूत माणसाकडे येतात तेव्हा लोक विचार करतात हा कमजोर का होत नाही . याचा विश्वास तुटत का नाही . परन्तु लोकांना हे माहित नसते तो अनेकदा तुटुनच मजबूत बनला आहे . मनाला एवढं मजबुत बनवा , कोणत्याही प्रसंगी , कोणत्याही व्यवाहारामुळे मनाचा विश्वास शांती कमजोर होणार नाही , शांती भंग पावणार नाही. धन्यवाद नमस्कार *🌹🙏शुभ प्रभात🙏🌹*

1 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad