Bluepad | Bluepad
Bluepad
जिवन प्रवासात अनेक अनुभवातून जाताना.
 Ghanshyam L Sangidwar
Ghanshyam L Sangidwar
12th Mar, 2023

Share

जिवन प्रवासात अनेक अनुभवातून पुढे जाताना आपण बरेच काही मागे सोडून निघून जात असतो . . व्यवहार , व्यवसाय , प्रवास , शैक्षणिक आर्थिक , सामाजिक , सर्व कामात , कामे पुर्ण करताना अनेक चुका होतात . आणि या चुका कधी चांगल्यासाठी तर कधी अनुभवण्यासाठी जिवन प्रवासात येत असतात . अनेक काही भिन्न अशा घटना घडतात . त्यात केव्हा नविन शिकायला मिळते तर केव्हा काही न शिकताच समोर जायचे असते. यात कधी नाराज व्हावं लागतं , तर कधी नुकसान सहन करावे लागत . हे सर्व स्विकारताना जर आनंदाने सहन केले किंवा थोडं संयम आणि शांततेने घेतलं तर काहीच फरक पडत नाही . परंतु कधी असे प्रसंग घडताना मागील पार्श्वभूमी काही तासापुर्वी , क्षणापुर्वी ची वेळ व मानसीकता अभ्यास ने गरजेचे असते . घटना घडण्यासाठी कोणतं तणाव निर्माण झाल असाव. , वादविवाद , घाईगडबड , धांदरटता , धावपळ , वेळेची बचत या सर्व बाबींचा परीस्थीतीचा प्रभाव सुध्दा कारणीभूत ठरतो . प्रसंगी एकतर्फी विचार न करता समोरचा मानभंग करतो ,नकारात्मक बोलणं जसं तुला हे जमतच नाही , करूच शकत नाही , असे अनेक विचार अनेक प्रसंगामुळे डोक्यात असतात . आणि याच विचारात अपघात घटना कठीण प्रसंगांना समोर जावं लागतं . आणि या अनुभवातून जाताना महत्त्व पुर्ण असते ती वेळ आणि ते क्षण . वेळेची एक गोष्ट फारचं सुंदर असते . ती वेळ कसीही निघून जात असते . यशस्वी माणुस आनंदी असो अथवा नसो , परंतु आनंदी असणारे माणसं ही यशस्वी होतातच . चांगल्या लोकांच्या संगतीचा परीणाम चांगलाच असतो . कारण हवा जर‌ फुलांना स्पर्श करीत येत असेल तर सुगंधाचा दरवळ होणारच . याचप्रमाणे वाईट वेळ कोणाचीही असु शकते . पण तंस ती वेळ आपणामुळे कोणावरही येऊ नये . आली तसीच निघून जात असते .या सर्व बाबींचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की शांत राहण बरंच काही शिकवून जाते . उदाहरणार्थ जर एखाद्या मुलांस वारंवार वारंवार नकारात्मक बोलले जात असेल ,जसे तु पास होणारच नाही , तुला काही करताच येत नाही , अशा वेळी ती मुले पुढे जाऊन अभ्यास करणारच नाही . गरज असते ते प्रोत्साहित करणं व सक्षम मार्गदर्शन करण्याची . चांगले व सकारात्मख ऊर्जा निर्माण करण्याची बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न वमार्गदर्शनाची कान लावून नाही तर मन लावून ऐकावं लागते . समोरच्याच म्हणणं काय आहे , कशासाठी आहे , या साठी तयारी असावी . आणि ठेवावी . प्रतिउत्तर देण्यासाठी नाही . यावरून एकच लक्षात येतं , जेव्हा कधीही जिवनात , आपल्या जिवनाची परीस्थिती अनुकूल नसते . तेव्हा आपण कितीही प्रयत्न , मेहनत कष्ट घेतले त्या प्रतिकुल क्षणाला . परंतु तेच क्षण जिवनात समोर जाण्यासाठी, आणि जिवनातील सत्य अनुभवण्यासाठीच हे सर्व घटना प्रसंग घडत असतात . असे म्हणतात जे होणार आहे ते टळत नसते . होणारी घटना होणारच. अनुकुल परीस्थितीतीच त्या क्षणात माणसाच्या विचार करण्याचा स्तर सामान्य असण्याऐवजी विशेष होत जातो . सन्मान सुध्दा वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते . आणि तेवढंच तिरस्कार सुध्दा संपुष्टात आणीत माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला न्याहाळीत मजबुत करीत असतो . आपण रस्त्यावर गाडी चालविणारा किंवा पायी चालत असताना सुद्धा काळजीपूर्वक ज्या ठिकाणी पोहचायचे आहे . तिथे पोहचण्यासाठी प्रयत्नशील प्रवास करीत असताना . कधी केव्हा कळत नकळत अति घाई किंवा बैचेन अशांत मन , किंवा अचानक उदभवलेली स्थीती यामुळे काही कठीण प्रसंग किंवा काही किरकोळ घटना घडून जातात. साधं गाडीला खरचटलं किंवा पायाला ठेच लागली तरी का असं झालं ,कोणती चुक झाली , आपण बेजबाबदार तर नाही ना , असे अनेक विचार मनाला स्पर्श करीत निघून जातात . थोडं पश्चात्ताप , थोडी नाराजी तर कधी थोड दुःख सहन करावे लागतं .वेळ आपल्या साठी प्रतिकुल नव्हती का . यासाठी जास्त विचार करण्याची गरज नाही जिवनात सदैव संधीची वाट न पाहता , संधी आपणास कसी उपलब्ध करता येईल हा साहस असला पाहिजे . जिवनात एक गोष्ट सदैव लक्षात यायला पाहिजे किंवा स्मरणात असली पाहिजे , तत्व सिद्धांतानुसार चालण किंवा तसं आचरण वर्तन करणे , वागणं , बोलणं , एवढं करुनही प्रसंगी हारण ,हार स्विकारले , खोटं बोलून वागून जिंकण्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ व उत्तम आहे हारण जिंकण या पेक्षा महत्त्व पुर्ण काय असेल तर प्रामाणिक आचरण सत्य सिध्दांत तत्व सत्याचा आणि श्रेष्ठतेचा मार्ग . आपण जिवनात तत्ववादी किंवा सिध्दांतवादी असाल तर आपल्या बाबतीत जिंकण्यापेक्षा जिवनात हारल्याची चर्चा अधीक असेल . जगात जे श्रेष्ठ महान झाले त्यांच कारण त्यांनी जिंकण्यापेक्षा हारण स्विकारले . परंतु सत्यासाठी सिध्दांतासी तडजोड केली नाही . सिध्दांत तत्त्वांचा त्याग केला नाही . सत्याचा मार्ग सोपा सरळ कधीच नसतो . क्षणाक्षणाला आपणास परीक्षेला समोर जावं लागतं . आणि हे तोच जास्त समजु शकतो जो जिवनात संघर्षासी लढला आहे . आव्हान समस्या विपरीत प्रसंगासी ज्यांनी दोन हात केले .यानंतरच जिवनात एक वेळ असी येते प्रत्येकाच्या मनात बोलण्यात आपलाच नांव असेल , जिवनात पहीलं महत्वाचे तंत्र माफी . आपणास कोणीही कितीही बोललं . तर अशा स्थितीत शांत राहणे , मनाला लावून न , मोठ्या मनानी माफ करण . अनेक प्रसंगांत काही बाबतीत अनेकांकडून मन अत्यंत दुखावलं जाते , अशावेळी तो समोरचा व्यक्ती समोर दिसायला नको , नजर मिळवायला नको अशा अंतर्गत भावना निर्माण होतात . त्या वेळी कायम स्वरुपी ती व्यक्ती दुर असलेले चांगले . कारण काय तर मोठ्या मनानी माफ केलं तरी अंतर्गत हार्मोन्स कोणीही बदल करू शकत नाहीत . म्हणजेच स्वताच्या प्रकृतीची , भावना आणि सर्वात मोठं आपलं जिव , प्राणापेक्षा काहीही कोणीही महत्त्वाचं नसतं . असं झालं असतं तर माफीनंतर शांती ठेवले असते तर कौरव पांडवाच युद्धच झालं नसतं .अशा वेळी प्रतिकार न करता भावना मनात राखुन ठेवणे .हेच मोठेपण होय .🌹🍂श्री गणेशाय नमः 🍂🌹 नमस्कार धन्यवाद 🌹🍂 घनश्याम संगीडवार 9511736153.

0 

Share


 Ghanshyam L Sangidwar
Written by
Ghanshyam L Sangidwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad