Bluepad | Bluepad
Bluepad
अंतरी हे स्वप्न कोडे ...
Ashish Sogam
Ashish Sogam
12th Mar, 2023

Share

अंतरी हे सप्न कोडे ..
भाव हृदयी प्रितीचे l
आस असे मनी ..
तुझेच हे वेडे l
स्वप्नी रंगुनी छेडे ..
गीत तुझ्या भेटीचे l
खंत खूप वाटे मला ..
तुझ्या निर्जीव स्पर्शाची l
जाणीव होई का तुला ..
माझ्या सजीव हृदयाची l
रिक्त पडलेल्या ओठांना ..
साथ तुझ्या बोलांची l
भासे गरज मज तेव्हा ..
कोवळ्या तुझ्या आठवणींची l
वाहे हा धुंद वारा ..
तू एकांत हा सागर किनारा l
क्षितीज मी हा वेडा ..
तुला कवेत बांधणारा l
बरसणाऱ्या धारांना ..
बंध तुझ्या प्रेमाचे l
चकोर होऊन मी झेले ..
थेंब तुझ्या प्रितीचे l
भास की आभास हा ..
नाही ठाऊक मला l
सत्य हेच अस्तित्व माझं ..
कळले हे तुला l
होऊन जाईन मी पूर्ण तेव्हा ..
साथ तुझी लाभे l
असे अंतरी हे सप्न कोडे ..
भाव हृदयी प्रितीचे l
आस असे मनी ..
तुझेच हे वेडे l
स्वप्नी रंगुनी छेडे ..
गीत तुझ्या भेटीचे l
- आशिष सोगम..

1 

Share


Ashish Sogam
Written by
Ashish Sogam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad