जिवनात अनेक प्रसंग घटना द्वारे माणसाला अनेक अनुभवातून जात असताना अनेक प्रकारच्या रंगबेरंगी खेळ खेळत अनेक रंगोत्सव साजरे करीत जिवनाला समोर जाताना , हे रंगोत्सव जिवनाला नवनवीन आकार आणि रचानात्मक बदल , घडवीत जीवनच बदलवुन टाकतात . हे जिवन आठ कर्माचे सप्तरंगाचे रंगोत्सवाची होळी आहे . अनेक विचार अनुभवातून जे चांगले कर्म आहे ते स्विकारले आणि वाईटाचा त्याग करुन अंतर्मनातील आग प्रज्वलित करीत भडका लावुन राख रांगोळी करण्याचा रंगम्होत्सव होली, मनातील वाईट विचार , वाईट शक्तींचा नाश करीत. स्वच्छ पारदर्शक प्रामाणिक मनाला अंधाळातुन प्रकाशाचा उजाळा देण्यासाठी आठ कर्माची व सप्तरंगाची होळी जे कर्माने नशिबाने मिळाले ते आपले . ते संपत्ती असो अथवा नाते असो वा सत्संगाने मिळालेले मित्र असो अथवा कुटुंब हे सर्व जिवनातील सकारात्मक आपली झोळी , ज्या झोळीत कर्माने टाकले व नशिबाने मिळाले . मन जागृत व प्रफुल्लित ठेवण्याची भोळी संकल्पना , या सर्वांसोबत मिळुन मिसळून खेळण्याची होळी , जे चारही विचार उपदिशा दिशा अशा आठही मार्गांनी समोर पाऊल टाकीत रंग भरण्याची जिवन रुपी सप्तसुरांची सप्तरंगाची रांगोळी , जे कधी मनात दडलेल्या चारही मार्गांनी अश्रुंना मोकळे करीत मन हलकं करीत पुन्हा नव्याने जगण्याची ऊर्जा प्रगतीची वाट मोकळी करण्याची व निर्माण करण्याची होळी , शुध्द सकारात्मक नजरेने भावनेने शुभ अशुभ भरणारी होळी , जे व्हायचे आहे ते घडले , सुख दुःख दाखवीत लपवीत जाळणारी अशा कर्माची होळी, अनेक रंगात रंगवणारी भरवणारी होळी . अशा कर्मात रंगवणारी सफेद रंग प्रमाणे पारदर्शक स्वच्छ बनवणारी होळी , लाल रंगाप्रमाणे स्वःताला सिध्द करण्यासाठी प्रयत्नशील असण्याची होळी, पिवळा रंगाच्या ते आई वडील गुरुंनी दाखविलेल्या मार्गावर आदर्श आचार्य बनवणारा रंगाची होळी , हिरवा रंगा प्रमाणे जिवनाला फुलविणारा आचारी बनविणारा रंगोत्सव धुलीवंदन, काळा रंगाप्रमाणे साधं सरळ मनातील काळ रूप संपुष्टात आणुन साधु संतांच्या विचारांप्रती चालना देणारी मौनत्व स्विकारण्याचा रंग. अशा प्रकारे अनेकांना एकत्र आणणारी , अनेकांना अनेक प्रकारे सादर करण्याची व मनवण्याची व जिवन बनवण्याची आकार देण्याची होळी . आपणास आपल्यांसोबत मिळविणारी होळी , आनंद आनंद समृध्दी संपन्नता यशस्वीता समाधान देणारी होळी , वर्षानुवर्षे दुर असणार्याना एकत्र आणणारी होळी . अशा अनेक रंगांची , रंगांनी भारलेली गुणांची होळीच्या आनंद पर्वावर आपल्या जिवनात आनंद समृध्दी संपन्नता यशस्वीता समाधान वाढविण्यासाठी तुम्हास दिर्घायुष्य लाभो, यश किर्ती सन्मान लाभो , वाढो व आपला सत्कार सन्मान कायम असो , प्रत्येकच दिवस , दिवसाचा क्षण, शुभच असो ., शुभ असो आपले कर्म कर्तव्य विचार आचार , यशस्वीता संपन्नता नियमित तुम्हच्या पाठीशी असो . आपले जिवन सप्तरंगानी बहरलेलं , अष्टपैलू व्यक्तीमत्वांनी सदैव प्रफुल्लित असावे . अशा होळीच्या व रंगोत्सव धुलीवंदनाच्या अनंत कोटी शुभेच्छा ............. घनश्याम संगीडवार 9511736153.