कसे रे फुलपाखरा करावे तुझे वर्णन..!
टिपले डोळे पाखरांवर आणि कळले तुझे जीवन..!
कसं बरं जातोस, तू अनोळख्या वाटेने..!
उडत-उडत की, थांबत-थांबत जरा कळू दे नजरेने..!
इतरही असतात तुझी पाखरे रंगबिरंगी.!
त्यातून फुलवतोस तुझ्या जीवनात आनंदाच्या लहरी..!
बोलावे तेवढे कमीच तुझ्या जीवनाविषयी..!
क्षणात उडतो, क्षणात थांबतो तरी दुःख नाही जीवनी..!
उडतोस मनमुराद आणि थांबतो ही..!
आलेला दिवस बघतो,आणि विसर्तोही..!
कसे रे फुलपाखरा करावे तुझे वर्णन..!
शब्दात की भावनेत जरा कळेल का तुझ्या मनातले वर्णन..!
धन्यवाद.
-अपूर्वा जगम.
०७ मार्च २०२३