Bluepad | Bluepad
Bluepad
क्लास room भाग दुसरा
अक्षय चरण सितापुरे
अक्षय चरण सितापुरे
12th Mar, 2023

Share

क्लास room भाग दुसरा
गुलाबी रंगाची साडी, हातात डस्टर दोन-तीन खडू आणि वयाने 30 ते 32 वर्ष वय असणाऱ्या, असे त्या मॅडमचे वर्णन...................त्यांच्या कडे पाहून मनाला थोडी का होईना भीती वाटत होती,पण पुढे चालून याच मॅडमने शेवट पर्यंत आम्हला प्रत्येक विद्यार्थ्याला सांभाळून घेतले.त्या आम्हाला हिंदी विषय शिकवणार होत्या,सुरुवातीला मात्र मॅडमने वर्गात शिरताच सर्वांवर फायरिंग सुरू केली,मॅडम वर्गात येण्याआधी सर्वांचा गोंधळ सुरू होता,त्यांना वर्गात पाहताच सगळा वर्ग शांत झाला. अखेर मॅडम ने बोलण्यास सुरुवात केली.
" मी सौ.प्रतिभा शिंदे , तुमच्या वर्गाची वर्गशिक्षिका......,आता दोन वर्षे तुम्ही माझ्याच ताब्यात आहात, काही अडचण असेल तर बिनधास्त मला विचारायचे, मलाच नाही तर कोणत्याही शिक्षकाला तुम्ही विचारले, तर काहीच हरकत नाही.पण स्वतःमध्ये असणारी शिस्त,सिंसीयरपणा कधी कमी होऊ देऊ नका......कारण आता तुम्ही शाळा सोडून कॉलेज ला आला आहात.म्हणजे तुम्ही मोठे झाले आहात.याचे भान राहू द्या,आपल्या कॉलेजच्या काही नियम व अटी आहेत. त्या मी तुम्हाला वाचून दाखवते......त्या मात्र नक्की लक्षात राहु द्या."
असे म्हणत अखेर त्यांनी वाचण्यास सुरुवात केली.
पहिलाच नियम हा मोबाईलच्या संदर्भात होता.
"नियम क्रमांक एक - कॉलेजच्या प्रांगणात शक्यतो मोबाईल आणू नये,आणि जरी आणला तर त्याला चालू करू नये.अन्यथा कारवाई करण्यात येईल."
"पहिल्याच दिवशी नियम आणि अटी"............
अभि स्वतःशीच बोलु लागला.सगळी मुलं त्या मॅडमचे ते बोलणे ऐकत होते, अभिचे लक्ष पहिल्याच नियम ने विचलित झाले होते, तो मात्र अमोलची येण्याची वाट बघत होता.जसाजसा दिवस पुढे सरकत होता.......... तसा अभिच्या मनात प्रश्न वाढत चालले होते. की अमोलचा कोणत्या वर्गात नंबर लागेल.........अखेर त्याची आतुरता संपली आणि अमोल वर्गात येऊन बसला .
"अरे कुठे होता रे अमोल तू........"अभि ने अमोल ला विचारले.
"अरे काही नाही , ऍडमिशन करून आलो माझे आताच आणि याच वर्गात नाव घ्यायला लावले.तू पण याच वर्गात होता म्हणून"..........अमोल अभिशी बोलत होता.
थोड्या वेळाने अटी आणि नियमचा तो कागत दुमडत मॅडम ने पुन्हा एकदा सर्वांशी बोलायला सुरुवात केली....."
"समजले ना सर्वांना नियम व अटी........ "
काहीच कळले, नसतानाही मी आणि सर्वच विद्यार्थ्यानी होकारार्थी मान हालवली.
"नियम आणि अटी लक्षात ठेवून दोन वर्षे आनंदाने या रेसिडेंशिअल च्या विश्वात मनसोक्त भरारी घ्या......पण तीच भरारी घेण्यासाठी सर्वांची ओळख एकमेकांशी व्हायला हवी ,मी जशी माझी ओळख प्रत्येकाला करून दिली, तशी स्वतःची ओळख प्रत्येकाने सांगायची आहे. त्यात स्वतःचे नाव आणि कुठून आला आहे, एवढेच सांगून खाली बसायचे.कोण सुरुवात करणार ..........."
 मॅडम हे चे वाक्य कानावर पडताच, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक भीतीचे वातावरण तयार झाले....... कोणीच उठायला तयार नव्हते, त्या वर्गातला प्रत्येक जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागला होता.........कोण सुरुवात करणार काहीच कळत नव्हते,माझे पूर्ण लक्ष वर्गात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे होते.मी हे सगळे माझ्या डोळ्यांनी अनुभव घेत होतो.
   थोड्या वेळाने अमोल स्वतःहून उभा राहिला आणि बोलू लागला."मॅडम मीच सुरुवात करतो माझ्यापासून......."असे म्हणत त्याने बोलण्यास सुरुवात केली.
" माझे नाव अमोल प्रकाश जाधव ......मी अहमदनगरचाच आणि मला इयत्ता दहावीला 73 टक्के मिळाले आहेत."इतके बोलून अमोल खाली बसला..........
"पहा याला म्हणतात ,आत्मविश्वास ..........स्वतःपासून सुरुवात करायला देखील हिम्मत लागते.........",मॅडमने अमोलची वाह वाह केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता..........आता अभिची बारी होती....पण अभिचे लक्ष अमोल कडे होते तो त्याच्याशी बोलत होता.
"वाह रे वाह पठ्या, पाहिल्याच दिवशी छाप केली तू तर........"अभिला अमोलशी बोलताना मॅडम ने बघितले होते, तेव्हड्यात त्यांनी अभि ला आवाज दिला.
"साहेब तुम्ही कुठले ते सांगा, तुमचाच no आहे....." अभि उठून उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली.माझे नाव अभिजित संजय जाधव मी पण मूळचा अहमदनगरचाच..........
"जाधव म्हणजे तुम्ही दोघे  भाऊ का ...?" मॅडम ने लगेच मला प्रश्न विचारला...... आणि मी बोलायला सुरुवात केली, "होय आम्ही मावस भाऊ आहोत."
मॅडम ही विचारात पडल्या होत्या, मावस भाऊ असताना आडनाव कसे सारखे असेल .......मॅडमला चिंतेत पाहून अमोल ने मॅडम ला सांगीतले.
"माझी आई आणि अभि ची आई दोघी सख्या बहिणी पण एकाच घरात दिलेल्या........"अमोल बोलत होता आणि सगळं वर्ग ऐकत होता.अमोलचे बोलणे संपल्यानंतर प्रत्येक मुलांनी त्याची ओळख सांगण्यास सुरुवात केली.मुलांची ओळख संपल्यानंतर नंतर आता मुलींची बारी होती.माझे सर्वांचे लक्ष मुलिंकडे होते.
दोन तीन मुलींची ओळख सांगून झाल्यानंतर माझी नजर अभी आणि अमोल वर पडली.ते दोघे त्याच मुलीबद्दल बोलत होते,जी तिची स्वतःची ओळख सांगत होती.त्यांच्या कडे बघितल्यावर माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला.हे दोघे या मुलीबद्दल चर्चा करताय .......हे हिला ओळखतात का.....?पण कदाचित ओळखत ही असावे,कारण त्या मुलीने देखील या दोघांना 11 h मध्ये बघितल्यावर वर्ग बदलण्याचा निर्णय घेतला होता.काय कारण होते, मला कळतच नव्हते.पण कालांतराने नंतर जशी माझी अमोल आणि अभिशी हळू हळू ओळख होत गेली, तसे हळूहळू बऱ्याच गोष्टी मला त्यांच्या बद्दल कळायला लागल्या.ती मुलगी बोलतच उभी होती 
"मी सायली बाबासाहेब वाघमारे अहमदनगरच्या प्रगत विद्यालय इथून आले आहे मला इयत्ता 10 वि ला 82% मार्क्स मिळाले .
अभि लागेच अमोल शि बोलायला लागला "अमोल ही तर लय हुशार आहे रे.....तिला तर 82 % मार्क्स आहे." अमोल ने अभि ला सांगितले "तुला काय करायचे आहे, तू तुझे बघ, तुला लय उत.....,तू का तिच्याकडे लक्ष देतोय."अमोल आपल्यावर चिडतोय,हे पाहून अभी देखील शांत झाला....जवळ जवळ सगळ्या मुलांचं स्वतःची ओळख सांगून होत आले होते....बाहेर मस्त गार वातावरण तयार झाले होते...आभाळ देखील आता भरायला लागले होते....पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस केव्हाही पडणार हे प्रत्येकाला माहीत होते ......आणि अशातच माझ्या मनात एक विचार आला,अरे आज पहिल्याच दिवशी पाऊस पडतोय की काय ........... ?पण तसे काही झाले नाही.
   काही वेळाने ती सायली नावाची मुलगी वर्ग बदलून दुसऱ्या वर्गात जाऊन बसली.कॉलेजचा पहिलाच दिवस असल्यामुळे कॉलेज लवकर सुटणार होते......अखेर दोन वाजले आणि कॉलेज ची बेल वाजली......इयत्ता 11 वीचे कॉलेज सुटले घरी जावे की नाही असे वाटत होते.कारण पहिलाच दिवस असल्यामुळे इतक्या लवकर घरी जाण्याची इच्छा माझी तर  अजिबात नव्हती.बाकीच्यांच्या मनात ही कदाचित हाच विचार येत असेल कुणास ठाऊक.............पण कुणाशी बोलता ही येत नव्हते आणि त्यांना विचारता ही येत नव्हते...कारण ओळखच कोणाशीच नव्हती, सगळेच अनोळखी होते.
काही वेळ गेट च्या बाहेर आल्यानंतर मी गेट समोर उभा राहिलो. ......आणि माझी नजर ही अभि कडे आणि अमोल कडे गेली. कदाचित हे दोघे माझे मित्र असू शकतात,असे नेहमी वाटत होते......कारण पहिल्याच दिवशी वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अमोल आणि त्याच्या आनंदात आनंद शोधणारा अभि यांसारखी मित्रांची जोडी मी पहिल्यांदा अनुभवत होतो ,मैत्रीच्या विश्वात रमणारे हे दोन जिवलग माझेही मित्र असावेत,असे मनाला वाटत होते, पण त्यांना विचारण्याची हिम्मत होत नव्हती.........,ते दोघेही घरी जाण्याच्या तयारीत होते आणि त्यांनी दुपारी ठीक 3 वाजता त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता पकडला आणि काही वेळाने मी देखील माझ्या घरी जाण्याचा निर्णय घेतला........
   मी माझ्या घराच्या दिशेने निघालो,माझे घर लांब असल्यामुळे थोडा वेळ मला लागणार होता.पण घरी जाता जाता मनात एकच विचार सतत गोंधळ घालत होता.मी आर्टस् ला आलो,ती माझी चूक झाली.कारण मला सायन्स ला जायचे होते.माझ्या डोक्यात इंजिनिअरिंग ला जाण्याचा विचार असल्यामुळे मला आर्टस् यायचे नव्हते.....पण नाईलाजाने आता आर्टस् तर आलोय .आर्ट्स ला आपली देखील एक ओळख निर्माण करायची आहे, मी कोण आहे हे मला सिद्ध करून दाखवायचे आहे.कॉलेजच्या त्या चार भिंतीतले विश्व मला देखील अनुभवायचं आहे.......या आणि अशा किती तरी विचारात असताना अखेर माझे घर केव्हा आले ते कळलं देखील नाही.
क्रमशः.......

1 

Share


अक्षय चरण सितापुरे
Written by
अक्षय चरण सितापुरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad