नाही नाही शक्य नाही होणं नाही भले इतिहास आपला काहीही असो मराठी माणूस पारंपरिक नोकरी करणार पिढ्यानपिढ्या नोकरी नोकरीचे संस्कार एसी कार्यालय बसायला टेबल खुर्ची सोबत एक शिपाई मोफत वायफाय अधिमधि चहा कॅन्टीन अ सेल तर पंचतारांकित ट्रीट बास बोनस पगारवाढ सुट्ट्या अ स्प्रेसल चारो उंगलीया घीमे असे हि नाही देवाने बुद्धी वेगवेगळी दिलीय नाही सर्वांना समान इतर प्रांतीय जे धाडस दाखवितात ते मराठी दाखवत नाहीत दाखविले तर प्रथम हसतात निंदा करतात आला मोठा अंबानी अडाणी टाटा बिर्ला बनायला बघूया किती मजल मारतो ह्यांची हयात गेली नोकरी करण्यात सकाळी साडेपाचला उठायचे टिफिन घेऊन कामावर जायचे हा नित्यनियम रीतसर सेवा निवृत्त व्हायचे मराठी माणसाने नाकासमोर सरळ चालायचे अंथरून पाहून पाय पसरवायचे बस्स जन्माचे सार्थक झाले अरे धंदा सुरु केला कि लोक चांडाळ चौकडी नाहक हकनाक त्या नव उद्योजकाची खिल्ली उडवितात टर खेचतात उलट त्याच्याकडून काहीही खरेदी न करता इतर होलसेलर कडून माल विकत घेतात व गावभर दवंडी पिटवितात कि अमुक विकतो ना त्यापेक्षा दहा रुपये कमीनेच ती वस्तू मिळते याचा प्रचार व नव उद्योजकचा अपप्रचार चालूच राहतो व शेवटी नव उद्योजकाचा धंदा बंद पडतो
या चांडाळ चौकडील असुरी आनंद होतो हि चांडाळ चौकडी एरवी कधीही दिसणार नाही अचानक वात्रट लोकांचा ग्रुप तयार होतो तो आणि त्यांच्या ग्रुपचे एकाच मिशन नव उद्योजकाचा अंत पाहणे चुकून झालाच यशस्वी तर तो हा त्याच्यात ट्ट्यालेंट होते आणि अपयशी ठरला तर जेनो काम तेनो कारे दुजा करे गोटा खाय हे व्यवसाय वैगरे मराठी लोकांची कामे नाहीत व्यवसाय करावा तर परप्रांतियांनीच शिवाय परप्रांतीय हि कमी नाहीत लगेच कॉपी करतात धंदा सगळेच नाही आता मी स्वतः परप्रांतीय दोन व्यावसायिकांशी मैत्री वाढवली ते बसायला जागा द्यायचे त्या जागेचा हफ्ता द्यावा लागायचा हफ्ता गोळा करणारे मराठी सर्वपक्षीय कार्यकर्ते मी बोललो साहेब आपण य पक्षाचे ना मराठी माणसाशी आपुलकीने वागणारे वेळप्रसंगी मदतीस तत्पर मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्पर आपण माझ्याकडून हफ्ता घेता ते म्हणाले ते पक्षाचे विचार हा आमचा आर्थिक स्थानीक लेव्हलचा आर्थिक विचार ताबडतोब दे शंभर नाहीतर चालत हो xxx शिव्यांची लाखोली वाहिली अहो दहा लोकात इज्जत काढली अपमान केला मी दोन वर्षे हा त्रास सहन केला कारण इतर परप्रांतीय हे हफ्ता देऊन करतात ना धंदा रस्त्यावर मी हि तेच केले परप्रांतीयांशी दोस्ती केली असता कोणत्या वेळेत मुन्शिपालिटी येणार ते सावध हि करतात मला सांगायला आनंद वाटेल एक बांगडीवाला आणि दुसरा परकरवाला अजून एकाच उल्लेख करावासा वाटेल धाकड भाजीवाला त्याने मला एक क्रेट फुकट दिला चला धंदा कर प्रोत्साहित केले तो स्वतः भाड्याच्या घरात राहतो एक टेम्पो चार हातगाड्या दोनअक्टीवा बाईक आहे घरातील दोन्ही मुले शाळा सांभाळून व्यवसायात मदत करतात धर्मपत्नीही वेगळी हातगाडी लावते व्यवसाय करत चार हातगाड्या आहेत स्वतःच्या दिवसाला एकंदरीत सगळ्यांचे मिळून ३००० रुपये येतात निव्वळ नफा खोत वाटेल पण सत्य आहे एक आहे गौतम रुमालवाला तो हि माझ्यासाठी दोन बाय दोन जागा राखीव ठेवायचा मी हि आठवडा बाजाराचे वेळापत्रक बनविले होते सोमवार सागर्ली बाजार मंगळवार पवार नगर बुधवार देसलेपाडा गुरुवार ललित काटा शुक्रवार सागाव शनिवार सोनारपाडा रविवार पिंपळेश्वर मंदिर व्हायचे काय माल संम्पल्यानंतर आणायचा कुणी घरातील सदस्य म्हणायचे कुटुंबप्रमुख तुम्ही कसेही पैसे कमवून घरात आनाआपण राहतो तो टॉवर वॉचमॅन लिफ्टवाली इमारत हे आपले स्टेटस हि आपली इज्जत लोक काय म्हणतील ????????हे चांगल्या घरचे लोक हे काय भिकार्डे धंदे भिकेचे दळभद्री धंदे नातेवाइक काय म्हणतील चला हळू हळू मला लक्षात आले कुणाचाही सपोर्ट नाही पंतप्रधान स्वनिधी फेरीवाला लोन हि संपले चला मी वाल्मिकी कृषी आठवले आता मी नोकरी करतो अजूनही इच्छा आहे बघू मी बोलबच्चन नाही मला हातावर विश्वास आहे पण एकदम धंद्यात उडी मारून बघितली नाही झेप घेता येत मी अनुभव घेतलाय धंदा वाईट नाही परंतु महागाईपुढे मी झुकलो महिनोन्महिने घराचा मेंटेनंस थकला कुणाकडे मागणार उलट ते लोक बोलतात आम्ही सांगितले होते धंदा करायला धंद्यात मराठी माणसाचे असेच होते न घरका न घाटका आम्ही आधीच सावध केलेले ???????????? महत्वाचे धंद्याला मरण नाही केव्हाही कधीही कोणत्याही वयात करता येतो मी हार मानलेली नाही सध्या मी थेट दुकानात जाऊन रोकडा व्यवहार करून थोडा थोडा सप्लाय करतो आता तर मी व्यवसाय पार्ट टाईम करतो १००% सत्य प्रत्यक्ष धंदा केल्याशिवाय कळत नाही यश अपयश टक्के टोणपे आपल्यालाच ठाऊक जे जे यशस्वी मराठी उद्योजक झालेत त्यांची गत उन्दराला टोपी सापडते तशी गत आपल्याला धंद्याची लाईन मिळाली हा कोण आता आता येऊन प्रदार्पण करणार आल्याचे पंख छाटू कसा उडतो पाहू त्याला हे यशस्वी उद्योजक सल्ल्ला देतच नाहीत संम्पर्क साधत नाहीत कसा अपयशी होईल हे स्वप्न बघतात आपल्याला धंदा जमतो आपल्याच खानदानात पैसा आला चला एक काम फत्ते झाले सगळेच निश्वास सोडतात अगदी बाहेरचे कशाला घरातील सदस्यही पाय खेचतात रोज रोज बाबा ही कामे धंदे बिंदे परप्रांतीयांचे आपण नऊ ते पाच नोकरी
अहो धंदयांत जी मजा आहे ना ती इतरत्र कुठेच नाही लक्ष्मी माता स्वतः प्रगट होते परंतु कुणीही मनावर घेत नाही नित्यनियमाने सिद्धिविनायक तिरुपती बालाजी शिर्डी पंढरपूर अष्टविनायक देवदर्शन मराठी करतात परंतु धंदा करा म्हटले नाक मुरडतात इतर प्रांतीय काय म्हणतील लाज अरे मराठी माणूस शिवाजी महाराजांचे मावळे हे रस्त्यावर कसे आले यांनी नोकरी केलेली बरी असेच सॅले इतरप्रांतीय देतात जेव्हा केव्हा मराठी माणसाने धंदा सुरु केला आपले व परप्रांतीय चुकीचा सल्ला देतात जेणेकरून मराठी माणूस नोकरीतच स्थिरावला पाहिजे हा हेतू मराठी माणसाची क्षमता सगळ्यांना स्वतः मराठी माणसांना माहित आहे पण मानसिक खच्ची कारण करणे हाच त्यामागचा उद्देश
धंदा एकदा सुरु झाला रोज खेळते भांडवल हातात साला आमच्यासमोर गर्दीत एका पायावर उभा राहणारा चौथ्या सिटीसाठी रेल्वेत भांडणारा मोठा उद्योजक झाला तर आम्ही असेच लटकत ट्रेन ने जाणार हा मस्त भाई रोज हजारो रुपये कमविणार साला मोठा माणूस बनणार आणि या मानसिकतेतून युद्ध सुरु होते अगदी भावापासून घरातून वेळीच असहकार केल्यामुळे मोहीम काय फत्ते होत नाही भिकारxx दळभद्री इज्जत नसलेले कसले धंदे धंदा म्हणजे भीक मागण्यासारखे आहे असा प्रचार करून घरातील व बाहेरचे सगळेजण मराठी नवउद्योजकास नामोहरण करून सोडतात एकसारखी वाल्मिकी ह्रिषीन्ची कथा ऐकवितात व वाल्मिकी बनण्याचा सल्ला फुकट मोफत फ्री एड्वाईज देतात
सोप्प गणित नोकरी केली दिवसाला सहज ६०० परडे मिळतात धंदयांत पाच रुपये किंमतीने शायनिंग पावडर एम आर पी
दहा सरळ ५ रुपये निघाला प्रॉफिट दिवसभरात विका ना २०० पाकिटे २०० गुणिले ५ बरोबर १००० गुणिले २५ सरळ सरळ २५००० आलेकी गुंतवणूक किती बाळांनो २०० गुणिले ५ एकहजार फक्त फायंदा २५००० सुरुवातीला अर्धवेळ करणे चांगले
माझ्याशी संपर्क करा ९३२०४२००६९ माझा व्यवसाय वाढविणे आपल्या हातात आपण साथ दिली तर माझा व्यवसाय वाढेल मि कूठून आणतो ? कितीला आणतो ? किती नफा मिळतो ? तो पत्ता द्या ? तिथे जाऊन आम्ही आणू माल अगदी स्वस्तात !तुमच्या धंद्याचे सीक्रेट उघड करा तर सॉरी!! तुमच्यापेक्षा कमी रेटमध्ये कारण तुम्ही छापता नफा कमवीता तुम्ही मजा मारता आमच्या पैश्यावर म्हणून बऱ्या बोलणे सांगा नाहीतर हाच माल दुप्पट तिप्पट पैसे मोजून परप्रांतीयांकडून घेऊ घेऊच तुझ्या नाकावर टिच्चून असे चॅलेंज कराल तर तुम्हीही मला ग्राहक नकोच कारण तुम्हीही त्यातलेच काय फरक काय ? शेवटी एकला चालो रे मेरा मिशन मला कुणाचीही गरज नाही चला वाचून मनोरंजन झाले ना मग गप्प बसा माझा हात जगन्नाथ माझ्या हातावर विश्वास लाथ मरेन तिथे पाणी काढेन मी अंथरून शिवून पाय पसरतो मी माझ्या धंद्यात खुश हा ते बोललं त्यांनी साथ नाही दिली त्यांनी मला प्रोत्साहित केले त्याचे श्रेय मी त्यांना देणारच नाही का देऊ ? अरे शंभर किती १०० लोकांना इमानदारीत भेटा ९० किती नव्वद नकार डीसअपृवल पचवा पचवावेच लागेल मग कुठे १०ग्राहक भेटणार मार्केटिंग कशी कधी कुठे यु ट्यूब आहे गूगल आहे महागुरू कशाला कोण हवा मार्गदर्शक ? इंटरनेट चॅटजीपीटी ए आय टेक्नॉलॉजी मी ठार धंद्यासाठी वेडा भिकारी समजा दारोदार माल विकणारा म्हणून हिंणवा कुठपर्यंत कधीपर्यंत अंबानी बनतो वाट तुम्ही बघा मी शंभर लोकांना भेटतो नव्वद नकार पचवितो व उरलेले दहा माझे हक्काचे ग्राहक मिळवितो काही एम बी ए होण्याची व्हाईट कॉलरवाल्यानो गरजच मुळात नाही फक्त पाय खेचा खेचा मी अजून स्ट्रॉंग मजबूत होनार तूर्तास बाय बाय बाय मुद्दामहून मी लेखात मराठी व्याकरण अव्हॉइड केले कुणीतरी टीका त्यावर करणारा हवा कुणाला कळतंय अर्धे तुम्ही इंग्रजी मिडीयम वाले असणार ना ?अगदी शेवटी सांगतो be sure you put your feet in the right place then stand firm