Bluepad | Bluepad
Bluepad
छत्रपती शिवाजी महाराज जयंती.. मानाचा मुजरा 🙏🙏 🙏
Uttamrao Nivrutti Nirmal
Uttamrao Nivrutti Nirmal
12th Mar, 2023

Share

#छत्रपती_शिवाजी_महाराज_जयंती
¶छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानाचा त्रिवार विनम्र मुजरा आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा
¶ राजे, आपली उपस्थिती आम्हाला आज प्रकर्षाने हवी आहे ....!
...... राजे, सांप्रतकाळी आपण फुलविलेल्या स्वराज्याच्या बागेत बाजारबुणग्या विषारी काट्यांची पैदास दिवसागणिक वाढते आहे....!!
...... राजे, जो तो स्वार्थी भावनेतून आपल्या नावाचा चलनी नाणे म्हणून वापर करु लागला आहे....!!!
.......राजे, ज्यांना आपल्या योग्यतेचे यत्किंचितही आकलन नाही, जाण नाही ती कमअस्सल पाखंडी पिसाळलेली पिळावळ, त्यांच्या नसलेल्या अकलेचे दिवे पाजाळू लागली आहे !!!!
....... राजे, त्यांना आता आपल्या टाचेखाली कुचलण्याची वेळ आली आहे !!!!!
........राजे, आपल्या भवानीच्या धारेचा आणि दांडपट्याच्या स्वैर फटक्यांचा झटका त्यांना दाखवायची घटीका समीप आली आहे !!!!!!
........राजे, जमलंच तर रायगडच्या टकमक कड्याचं ही तेवढं लक्षात असू द्या म्हणजे झालं !!!!!
.....राजे, यासाठी आपण परत यावे हीच अर्जी आहे आपल्या चरणी !!!
¶"हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!"
"...... जगदंब......"
¶ "जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.
¶"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा !"
-- नेताजी सुभाषचंद्र बोस.
¶"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !"
-- अॅडॉल्फ हिटलर.
¶"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
-- स्वामी विवेकानंद.
¶"जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना ‘सुर्य‘ म्हणूनच संबोधले असते !"
-- बराक ओबामा, अमेरिका
¶"जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
--एक इंग्रज गव्हर्नर.
¶"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं !!!...... पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला "सिवा भोसला" ने रोखलं ! मी सर्व शक्ती" सिवा" चा पराभव करायला खर्च केली, पण तो काही माझ्या हाती आला नाही !! या अल्लाह !!! दुश्मन दिया तो भी कौन दिया ? "सिवा_भोसला" जैसा दिया...अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)
¶"उस दिन" सिवा भोसला" ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी "सिवा भोसला" से मिलना नही चाहता !"
-- शाहीस्तेखान, खाफिखानाची बखर.
¶"क्या उस गद्दारे दख्खन से" सिवा" नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लानत है ऐसी मर्दानगी पे !"
........ बडी बेगम साहिबा विजापूर आदिलशाही
¶सतराव्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !
आणि मग आपले शिवाजी महाराज नक्की कोणते ?
¶आपले छत्रपती शिवाजी महाराज.... सध्यातरी दोन छावणीत विभागले गेले आहेत....एका छावणीला ते हिंदूपदपातशहा व मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणून मिरवायचे आहेत.....तर दुसऱ्या छावणीसाठी ते केवळ कुळवाडी भूषणच नाही तर स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या स्वराज्याचे जाणते राजे आहेत... . रयतेचे राजे आहेत...... ज्यांच्या पूर्वजांनी, महाराजांच्या हयातीतच, त्यांना साथ देण्याऐवजी त्यांची वारंवार कोंडी केली, त्या शिलेदारांचे वारसदार पहिल्या छावणीत आहेत.... ही स्वराज्यद्रोह्यांची छावणी !!
¶दुसरी छावणी ज्यांचे पूर्वज महाराजांसाठी प्राणार्पणास सिद्ध झाले त्या बारगीरांची आहे. हे मुख्यतः सर्वसाधारण परिस्थितीतील काटक, कर्तव्यनिष्ठ, कष्टकरी आणि निष्ठावान भूमिपुत्र आहेत.... शिवरायांवर प्राणापलीकडे प्रेम आहे, शिवराय हेच त्यांचे पंचप्राण आहेत , सर्वस्व आहेत ...धर्म आणि जातीभेदाच्या भिंती भेदुन, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी शिर तळहातावर प्राणाची बाजी लावून लढलेले हे शुरवीरच शिवरायांची कवचकुंडले होती.... ज्यांना मावळे या नामधिनामाने गौरविले जाते !!! त्यांच्या असीम त्यागामुळेच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले..आणि इतिहास घडला!!
¶पहिल्या छावणीला शाहिस्तेखानाची तुटलेली बोटे, अफजलखानाचा कोथळा यासारखा खूनखराबाच फक्त शिवाजी महाराजांचीओळख बनवायचा आहे.... महाराजांची इतर अलौकिक गुणवैशिष्ट्ये त्यांनी हेतुतः गौण समजली... महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढल्याचे जितक्या उच्च स्वरात सांगितले, तितक्याच उच्चरवाने महाराजांनी अफजलखानाच्या मृतदेहाची विटंबना न करता, कबर बांधुन त्यांच्या धर्माचरणाप्रमाणे व्यवस्था लावून देण्याचे आदेश दिले , हे सांगण्याची तसदी मात्र घेतली नाही.... जगात इतरत्र जास्त खूनखराबा केलेले पराक्रमी राजे इतिहासाच्या पानापानांवर तलवार परजताना दिसताहेत.... . मग रयतेच्या मनात त्या महापराक्रमींना का स्थान मिळाले नाही , जसे शिवाजी महाराजांना मिळाले ?..... याचे उत्तर इतिहासकार शेजवलकर याच अनुषंगाने अनाहूतपणे देऊन जातात.
¶शेजवलकरांनी शिवरायांच्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्याची आठ भागात विभागणी केली व दाखवून दिले आहे की, त्यातील सात भाग हे मुलकी कारभारातील व्यस्ततेचे आहेत व फक्त एक भाग लष्करी कारवायांचा आहे !!! सतत कमरलेला तलवार लटकवलेले शिवाजी महाराज आम्हांला या स्वराज्यद्रोहींनी दाखवले आहेत....मात्र त्याबरोबरीनेच रयतेच्या मनात स्थान मिळविलेले, मुलकी कारभारातून आपले प्रजावत्सल मन सतत प्रगट करणारे, जाणता राजा असलेले, शिवाजी महाराज, जनसामान्यांना दाखविणे हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे होते.
¶शेती हा तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होता. महसूलाचा प्रमुख स्त्रोत तोच होता. हा शेतकरी निसर्गाच्या अवकृपेचा वारंवार बळी ठरतो, म्हणून त्याच्याकडून शेतसारा घेताना तो शेतीच्या उत्पादनाचे नियतकालिक अवलोकन करुन त्याप्रमाणे घ्यावा. जर पीकच पोटापुरते आले आहे तर शेतसारा माफ करावा. जिथे वरकड झाले आहे तेथे त्याप्रमाणातच पट्टी घ्यावी. बी बियाण्यास मोताद असणाऱ्यांना ते सरकारातून द्यावे आणि पीक आल्यावर ते उजवून घ्यावे. रोखीत मोबदला मागू नये. शेतकऱ्याला तोशीस पडेल असा व्यवहार अधिकाऱ्यांनी कदापि करु नये, अशी सक्त ताकीद देणारा राजा रयतेने त्याआधी कधीच अनुभवला नव्हता.
¶शेतजमीनीची एकूण १७ प्रकारची प्रतवारी करून त्याप्रमाणे शेतकऱ्याची कुवत ठरविली जाई. केवळ किती क्षेत्र आहे यावर त्याची शेतसारा देण्याची कुवत निर्धारित केली जात नसे.
¶"रयतेच्या भाजीच्या देठासही तू निमित्त होता कामा नये. आंबा, साग आदी वृक्ष आरामाराचे बहुत उपयोगीचे. पण ही झाडे रयतेने आपल्या लेकरांसारखी वाढविली आहेत. ती तोडली असता त्यांच्या दु:खास पारावार काय ? हे वृक्ष धन्यास राजी करून रोकड मोजून घ्यावेत, बलात्कार सर्वथा न करावा ..." ही आज्ञापत्रातील काही वाक्ये आपल्याला शिवबा पिढ्यानपिढ्यांचे दैवत का बनले आहेत याचा प्रत्यय देतात.
¶शेतकऱ्याच्या बांधावर रमणारा, तलवारी इतकाच नांगरावर प्रेम करणारा आमचा जाणता राजा आमचा शिवबा आहे !
¶अफझलखानच्या बाजूने आपली पथके घेऊन उतरलेल्या शिळिमकर, बांदल, पिलाजी मोहिते, बाबाजी भोसले यांच्या वारसदारांना दिसलेले शिवराय आमचे नव्हेत.
¶मिर्झाराजे जयसिंहला विजय मिळावा यासाठी विधीमार्गनिमित्ते लाचखोरी करुन स्वराज्याची सारी गुपिते मिर्झाला सांगून ज्यांनी शिवबावर नामुष्कीचा पुरंदर तह व आग्रा कैद लादली व दगाबाजी करुन ज्यांनी शंभूराजांना मोगलांकडे सुपूर्द केले, त्या स्वराज्यद्रोहींनी वर्णन केलेला शिवबाही आमचा नव्हे !!
¶आमच्या मुस्लिम बांधवांच्या सरसकट विरोधात असलेला जो शिवबा तुम्ही आम्हाला दाखवत आलात, तो शिवबा आमचा नव्हेच... कारण आमच्या शिवबांनी अफजलखानाच्या मृतदेहाची विटंबना न करता कबर बांधून व्यवस्था लावून "मरणांती न वैराणी" ची शिकवण दिली होती.... स्वराज्य स्थापना कार्यातील मावळे म्हणून जे मुस्लिम शिवरायांसी एकनिष्ठ राहिले, तेवढे एकनिष्ठ, विशेषतः कर्तव्य असून सुद्धा, तुमचे पूर्वज कधीच राहिले नव्हते !!
¶इतिहासाचे एक पान असे काढून दाखवा की, जिथे शिवरायांचा मावळा म्हणून सोबत असणाऱ्या एका तरी मुसलमानाने त्यांना दगा दिलेला आहे....एक पान असे काढून दाखवा की, जिथे कुणी मांग, महार, बेरड, भिल्ल, रामोशी, भंडारी, कोळी, आग्री, शेतात राबणारा सर्वसामान्य कास्तकरी कुणबी मराठा, माळी, धनगर, वंजारी, कारागीर अशा अठरापगड जातीतून आलेल्यांनी शिवाजी महाराजांबरोबर दगलबाजी केली आहे.
¶छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त तीनच गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या जातात....!!
1.अफजलखानाचा कोथळा
2.शाईस्तेखानाची बोटे
3.आग्राहून सुटका
परंतु मला भावलेले आणि हृदयी विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतात....!!
1.आपल्या "आईला सती जाण्यापासून रोखणारे " छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे झेप घेऊन..... "सामाजिक क्रांती" करणारे शिवराय ...!
2.रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे ....."लोकपालक" राजे शिवराय ...!
3.सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच मोजपट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे ....... "उत्तम प्रशासक" राजे शिवराय...!!
4.विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे......."पर्यावरण रक्षक" राजे शिवराय ...!!
5.समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मा पेक्षा देश मोठा हा संदेश देणारे..... "स्व-धर्मचिकित्सक" छत्रपती शिवाजी महाराज ...!
6. मुहूर्त न पाहता , अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे..... चिकीत्सक राजे शिवराय!!
7. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे... जलतज्ञ राजे छत्रपती शिवराय !!
8. साडेतीनशे वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य अशा गडकिल्ल्यांचे निर्माते ,.... उत्तम अभियंते राजे शिव छत्रपती !!
9. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत ......सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे!!
10. परस्त्री मातेसमान मानत महिलांना सन्मानाने वागवाणारे..... मातृभक्त , नारीरक्षक छत्रपती शिवराय!!
¶आमचे शिवाजी महाराज हे रयतेसाठी, रयतेला घेऊन, रयतेचे राज्य आणणारे, फक्त एकमेव राजे आहेत !!...जाणते राजे आहेत !!!
¶प्रौढप्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर
हिंदवी साम्राज्य संस्थापक,
श्रीमान योगी,
योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नितिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, यशवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत,
रयतेचा जाणता राजा
महाराजाधिराज,
आपणां सर्वांचे मानबिंदू,
आराध्य दैवत आणि
अस्मिता
असलेल्या छत्रपती शिवरायांना त्यांच्या जयंती निमित्ताने
मानाचा त्रिवार विनम्र मुजरा🙏
🙏 🙏 जय जिजाऊ🙏 🙏
🙏🙏 जय शिवराय 🙏🙏
🙏 🙏 जय शंभुराजे🙏 🙏
"जय भवानी - जय शिवाजी - हर हर महादेव"
सौ. सुनंदा श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार.. 🙏
छत्रपती शिवाजी महाराज जयंती.. मानाचा मुजरा 🙏🙏 🙏

1 

Share


Uttamrao Nivrutti Nirmal
Written by
Uttamrao Nivrutti Nirmal

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad