आज ८ मार्च.. जागतिक महिला दिन.... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
महिलांनी आजकाल सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. नुसती भरारीच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून नवीन मापदंड निर्माण केले आहेत...नारीशक्ति काय असते याचे दर्शन यातून दृग्गोचर होत आहे... ही खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी अजून बरीच मजल गाठायची आहे, हे ही तितकेच खरे... 🙏
जितके गोड गोड त्याच्या कितीतरी पटीने अधिक विषण्ण करणारे चित्र आहे हे....कमाल विषमतेचे आणि विदारकतेचे दर्शक चित्र आहे हे !! समानतेच्या गुळगुळीत कागदावरील हा आलेख अंतर्मुख करणारा आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे... शहरी असो वा ग्रामीण असो, सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, श्रीमंत असो वा गरीब असो विकसित असो वा अविकसित असो महिलाप्रधान प्रश्नांची सोडवणूक करणे आहे.
पारंपारीक जोखड आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये अजुनही महिलांचे कष्टप्रद जीवन जसेच्या तसेच आहे. ग्रामीण भागात जेमतेम उदरनिर्वाहासाठी महिलांचे शारीरिक श्रम अद्याप संपलेले नाही. घरदार, मुलाबाळांची देखभाल करुन पुरुषांच्या बरोबरीने काम करणे यातून सुटका झालेली नाही....चालत आलेले एक चिरंतन वास्तव... कधी संपेल ?... माहीत नाही... पण त्यातुन बाहेर पडण्याचे अथक प्रयत्न चालू आहेत...यातुन बाहेर पडु तो सुवर्णदिन.... कधी तरी उगवेल ही दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावाद सुध्दा !!
कुटूंबव्यवस्थेचा कणा असलेल्या महिलाशिवाय कुटुंबाची व्याख्या पुर्ण होत नाही !! वेलीला झाडाचा आधार लागतो असे म्हणतात.....परंतु इथे तर वेलीच झाडांना आधार देताहेत !! आधार देता देता झाडाशी समरस होत, झाडाचा एक भाग कधी बनतात हे त्यांनाही समजत नाही !! एक मात्र खरे वेलींच्या या समर्पणामुळेच झाडाला एक आत्मविश्वास मिळतो.... त्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो... परिपूर्ण व आशयघन जीवनाची अनुभूती मिळते... एकट्या झाडाला जे अशक्य असते ते वेलीच्या सानिध्यात शक्य होते... दोहोंच्या उर्जेतुन एक आयाम मिळतो !!
होय... हे सारे व्हायला हवे असेल तर महिला शक्तिचा सन्मान झाला पाहिजे... परंपरेच्या जोखडात बांधले गेलेले त्यांचे पंख मुक्त केले पाहिजेत... बघा कशी मुक्त भरारी घेतील मग त्या !!
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सर्वंकष विकासाचा संकल्प करणे हीच महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !!
सौ सुनंदा व श्री. उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग व परिवार