प्रत्येकाला सत्य जाण्याची उत्सुकता पण सत्य कोणीही जगु इच्छित नाही
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023
Share
*प्रत्येकाला सत्य जाण्याची उत्सुकता पण सत्य कोणीही जगु इच्छित नाही*
सत्य हेच जगातील अंतिम शाश्वत जीवन मुल्य आहे . ज्याची गोडी प्रत्येकाला आहे पण सत्य जगताना अंनत अडचणी निर्माण होतात पण सत्य जाणून घेण्याची जिज्ञासा मात्र प्रत्येकाला असते .सत्याची गोडी नाही , शोध नाही, सत्य मार्गावर जगण्याची इच्छा नाही असु चुकुन पण शोधुन कोणीही सापडणार नाही.पण खरी गडबड होते ती वास्तविक दैनंदिन जीवनात आचरण करताना कधी मार्ग बदलतो तेच बहुतांश वेळा आपल्याला कळत नाही. सत्य हि अशी अनुभूती आहे कि त्याचा शोध प्रत्येकाला आहे . सत्याचा शोध नाही असं कोणीही चुकुन सुद्धा भुमंडळावर नाही. पण खरं वास्तव असं आहे कि सत्य मार्गावर कोणीही जगु इच्छित नाही.महणजे खुप कमी लोक या मार्गावर मार्गक्रमण करतात. त्याच कारण हि तसंच आहे सत्य जाण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे खरी पण सत्य हे कोणीही जगु इच्छित नाही .हिच कलयुगातील सगळ्यात मोठी घडामोड आहे. सत्य हे कटु असतं कठिण असतं पिडादायक असतं असं जरी प्रथम दर्शनी वाटत असलं तरी अंतिमतः सत्य हे शेवटी प्रभावी व गुणकारी आनंददायी ठरत. सत्याचा शोध आणि सत्याची भूक हि प्रत्येकाला आहेच. त्या मध्ये एतकिंचित सुद्धा शंका नाही.पण सत्य मार्ग सुरुवात हि कठिण असते .याच कठिण मार्गाला टाळुन लोक असत्य मार्ग शोधतात.आणि सत्याची अभिव्यक्ती होण्याची संधी दवडतात.ज्ञान तत्त्वज्ञान कोणतही असो कोणत्याही धर्माचा असो या सर्व तत्वज्ञान ज्ञानाचा पाया सत्य हाच आहे.मग जर ज्ञानाचा पाया सत्य असेल तर आपल्या जीवनाचा पाया सत्य का नसावा .तो असलाच पाहिजे.पण कृती करताना आपली गडबड होते .आपण तिथंच गोंधळून जातो . सत्याचा शोध आपल्याला नाही असं अजिबात नाही . पण आचरण करताना आपली खरी गडबड होते .हा आपला मुख्य घोळ आहे. शाश्वत जीवन जगताना सत्य हेच जीवनातील सर्व श्रेष्ठ अभुषण असतं . म्हणजे प्रत्येक पाऊल सत्यनिष्ठ असतो .पण दैनंदिन बदलती जीवनशैली आणि भौतिक जीवनातील प्रभाव यामुळे सध्या जीवनात अनंत अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.विज्ञान युगाचा प्रभाव दैनंदिन होणारे बदल हे व्यसन झालं आहे.या व्यसनाच्या आहारी जाऊन आपण धावत आहेत.किती धावतोय कुठपर्यंत धावणार याला काही मर्यादा आहे का या धावण्याच्या स्पर्धेत शर्यतीत आपण कधी स्वतःला हरवुन घेतो तेच आपल्याला कळत नाही. आणि नेमकं याच वेळी दरम्यान आपला सत्याचा मार्ग हरवतो. सुखाचा शोध घेण्याच्या नादात आपण कधी असत्य मार्ग स्वीकारला हे पण उमजत नाही. पण वास्तविक सुख हे सत्याच्या मार्गावरच आहे.पण ते कळत नाही ते लोकांना दाखवता येत नाही.आपण दाखविण्यासाठी उतावीळ असतो .पण सत्य हे आत्मिक समाधान असल्याने ते दाखविता येत नाही . त्याची अनुभूती घेता येते . सत्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी वेळोवेळी या सृष्टी वर अनेक संत महंत यांनी अवतार धारण करून लोकांना सत्याचा बोध करून दिला सत्य मार्गाचा परिचय करून दिला परंतु सर्व सामान्य माणसाला जीवाला सत्याचा मार्ग आचरण कारणासाठी कठिण जातो .हे जरी वास्तव असलं तरी हाच मार्ग खात्रीशीर आहे. जीवनाचं सार्थक घडविणारा आहे.हे समजण गरजेचं आहे म्हणजे सत्य जाण्याची जशी उत्सुकता आहे तसीच सत्य जगण्याची इच्छा निर्माण होईल. असत्याच्या मृगजळामागे लावण्यापेक्षा सत्य हे कधीही लाभकारी गुणकारी असत.आणि याच सत्याची कास धरण्यासाठी आपला जन्म झालेला आहे पण आपण आपल्या जन्माच मुख्य हितच विसरून जातो . आणि जे क्षणिक आहे भ्रमक आहे ते स्वीकारतो.शेवटी सत्य जेव्हा उमजते तेव्हा आपल्याकडं वेळ नसतो.हि व्यथा टाळण्यासाठी योग्य वेळी सत्याची जिज्ञासा, आणि सत्य जगण्याची उमेद इच्छा शक्ती कृतीशील पुर्ण झाली पाहिजे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक