Bluepad | Bluepad
Bluepad
स्त्री शिक्षणाची गंगोत्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023

Share

*स्त्री शिक्षणाची गंगोत्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले*
बालविवाह ,अंध श्रद्धा, स्त्रियांना अबाधित अधिकर, सार्वजनिक जीवनात दुय्यम स्थान,शिक्षाणासह अनेक अधिकारा पासुन वंचितता , फक्त चुल आणि मुल एवढंच विश्व आशा दयनीय परिस्थितीत अठराव्या शतकात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो नारी शक्ति ला मुक्त करण्यासाठी आदर्श जीवन जगण्याची ताकद निर्माण होण्यासाठी मुक्त छंद स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी पुरूषांच्या मागे नाही तर बरोबरीने पाऊल टाकण्यासाठी .जगाच्या तुलनेत भारतीय संस्कृती हि खूप प्राचिन असलीतरी अपवादात्मक स्त्रिया सोडल्या तर महिलांसाठी सामाजिक स्तरावर वातावरण फार पोषण नव्हतं . वेळेनुसार त्या त्या वेळी वेगवेगळी गणित लावत समाजव्यवस्था महिलांना दुय्यम ठरवतं गेली . संस्कार संस्कृती ची निर्माती स्त्री हिच मुळ शिक्षणापासून वंचित होती . शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली हिच ज्योत मशालीत रूपांतरित झाली आणि पाहता पाहता पुण्यात चालू झालेली क्रांती हि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली .यासाठी स्वतःच्या संसाराची तमा न बाळगता आपल्या पतीचा आदेश शिरसावंद्य मानून स्वतःला समाजसेवेसाठी झोकुन देणारया महान समाजसुधारक, समाजसेविका,शिक्षण तज्ज्ञ, कवयित्री, पहिल्या महिला शिक्षिका, खरया अर्थाने महिलांच्या शिक्षणाचा जगार करणार्या शिक्षणाच्या गंगोत्री म्हणून आपण ज्यांना संबोधतो त्या सावित्रीबाई फुले ह्या युगप्रवर्तक होत्या. युग परिवर्तन करण सहज नसतं . वेळ प्रसंगी दगड धोंडे चिखल माती सुद्धा अंगावर घ्यावी लागते.कोणतही कार्य सुरवातीला कठिण असतं खडतर असतं .तसच स्त्री शिक्षण हि काळाची गरज आहे.हे ओळखून ज्योतीराव फुले यांनी प्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित केले . पुणे येथे पहिली महिलांची शाळा काढत स्त्री शिक्षण हि उद्याच्या युगाची खूप मोठी गरज आहे हे काळच पाऊल ओळखत सावित्रीबाई यांच्या माध्यमातून इतर महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.वेळ काळ आणि परिस्थिती विरोधात असताना देखील निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी योगदान देताना अवहेलना अपमान तिरस्कार याची चिंता न करता समर्पित भावनेने आपल कार्य पुढे घेऊन जाणं हे सहज सोप नसत . तात्कालिन रूढी परंपरा याला थेट छेद देतान अनेक अडचणी पण ओढवतात पण धेय्य वेडी माणसं फक्त धेय्य वर लक्ष केंद्रित करतात आणि यशाल गवसणी घालतात.आपल्या आध्यत्मिक परंपरे नुसार गंगा हि भगिरथ यांनी प्रथम पृथ्वी वर आणली असली तरीही बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोहचवली ती राष्ट्र संत भगवान बाबा यांनी म्हणून बहुजन समाजात शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोहचवणारे भगिरथ म्हणून संत भगवान बाबा यांचा उल्लेख होतो .तर याच महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाची गंगोत्री म्हणून जयांचा उदय झाला त्या सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. साधारण अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात देशात इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष पेटुन उठला होता. छोडेभारत चळवळ दिवसेंदिवस गतीमान होत होती . स्वातंत्र्य लढा यशाच्या दिशेने मार्गक्रमण करत होता .याच वेळी एका बाजूला समाज सुधारणा हि सुद्धा काळाची गरज होती .हि गरज ओळखून ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवलं घडवलं आणि महिला शिक्षणाची संकल्पना मांडली व यशस्वी केली .या प्रवासात अनेक कटु वाईट अनुभव आले पण फुले दाम्पत्य डगमगले नाही.घाबरले नाही.अगदी नेटाने जिद्दीने कामाला लागले.आणि यशाचं शिखर सर केल.आपण फक्त शिखर पाहतो पण शिखर सर करताना केलेला संघर्ष दैदिप्यमान होता हे विसरून चालणार नाही.आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या पावन स्मृतीला कोटी कोटी वंदन
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad