Bluepad | Bluepad
Bluepad
जागतिक दर्जाचं तत्वज्ञान निर्मिती मध्ये कळस ठरलेले जगद्गुरु तुकाराम महाराज
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023

Share

*जागतिक दर्जाचं तत्वज्ञान निर्मिती मध्ये कळस ठरलेले जगद्गुरु तुकाराम महाराज*
आपल्या अमृत तुल्य अमोघ रसाळ वाणीतून सहज प्रकट झालेले बोल आज करोडो लोकांसाठी जीवन तत्वज्ञान ठराव हि किती मोठी विद्वत्ता ,हि विद्वत्ता ज्यांनी निर्माण केली ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे किती मोठे विद्वान असतील याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाहीत. दैनंदिन होणा-या अनंत अशा अघाता नंतर सुद्धा ज्यांच्यातील सज्जनत्व , सज्जनपणा, सत्यनिष्ठा एतकिंचितही अजिबात कमी होत नाही ते संत असतात. जगातिक दर्जाचे अनेक दिग्गज महान संत याच मातीत जन्माला आले हे तुमचं आमचं परम भाग्य परखड सत्यनिष्ठ मत मांडताना प्रचंड दुरदृष्टी समाजाला योग्य दिशा देताना सरळ साध्य सोप्या भाषेत व्यक्त केलेलं मत चिंतन हे जगातील सर्व श्रेष्ठ तत्वज्ञान ठरलं हे आपल्या सगळ्यांच्या साठी अभिमानाची बाब आहे.अंभग म्हणजे ज्याचा कधीचं भंग होत नाही असे अंभग निर्मिती मध्ये किर्तीमान स्थापित करत जगातील सर्व श्रेष्ठ असं तत्वज्ञान लोक कल्याणकारी ज्ञान निर्माते जनक वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे कोणत्याही शाळेचे विदयपिठाचे विद्यार्थी नव्हते.तरी अमर आणि जगातील सर्व श्रेष्ठ असं साहित्य निर्माण केले म्हणजे किती मोठी बाब आहे. त्यांनी त्याकाळी निर्माण केलेलं साहित्य आज आपल्याला समजून घेण्यासाठी कसरत करावी लागते .हि जरी चिंतनीय बाब असली तरी आपल्या संतांनी निर्माण केलेलं तत्वज्ञान किती उच्च दर्जाचे आहे हे तर नक्कीच शिक्कामोर्तब होत .त्या कालखंडात शाळा महाविद्यालये विद्यापीठे असं काही अस्तित्व नव्हतं. तरी देखील त्यांनी निर्माण केलेल तत्त्वज्ञान हे एवढं दिव्य आहे .कि आज हजारो लाखो लोक त्यावर अध्ययन करतात . आज वारकरी संप्रदायातील बहुतांश महंत जे किर्तन करतात त्या किर्तनाची अंभग रचना हि तुकाराम महाराज यांनी केलेली आहे. म्हणजे आज पासून पुर्व साधारणतः पाचशे सहाशे वर्षे होऊन सुद्धा तुकाराम महाराज यांनी निर्माण केलेल तत्त्वज्ञान संत साहित्य आज सुद्धा किती लोकप्रिय आणि प्रभावी आहे .याचा प्रत्यय वारकरी संप्रदायातील सध्या स्थिती पाहता लक्षात येईल. आजच्या पदवीधारकांना त्याकाळी निर्माण केलेले ज्ञान तत्त्वज्ञान समजुन घेताना कसरत करावी लागते.मग हे तत्त्वज्ञान किती उच्च पराकोटीच ज्ञान आहे .याची कल्पना आपसुकच येईल. एक ओवी एक अभंग कित्येक पुस्तक निर्माण करू शकतो म्हणजे किती भव्य दिव्य असं लेखन आहे.नाथ संप्रदाय भगवान श्री दत्त गुरु यांच्या कृपेने सुरू झाला आणि नाथ संप्रदायातील नव नाथा सह अनेक महान संत या मातीत जन्माला आले. त्या मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज,संत मुक्ताबाई,संत तुकाराम महाराज,संत एकनाथ महाराज,संत सद्गुरू स्वामी समर्थ, संत गजानन महाराज, संत तुकडोजी महाराज संत नामदेव महाराज, संत चोखामेळा,संत गोरा कुंभार, संत गाडगेबाबा,संत सावतामाळी, संत मन्मथ स्वामी, संत अवजीनाथ महाराज ,संत साई बाबा, संत सद्गुरू वामन भाऊ महाराज,संत भगवान बाबा, अशा अनेक संतांनी मिळुन जगातील सर्वात सुंदर श्रेष्ठ असं मानवी जीवन कल्याण होण्यासाठी ज्ञान अमृत ठरेल असं तत्वज्ञान निर्माण केलं . हे विश्वची माझे घर हि कल्पना प्रथम जगासमोर मांडत अध्यात्माचा पाया ज्यांनी रचला असे परम पूज्य संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जागतिक दर्जाचं तत्वज्ञान निर्माण केलं.त्याचा कळस रचला तो याच भुमितील जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी म्हणून आजही लोक असंच संबोधतात ज्ञान देवे‌ रचिला पाया तुका झालाशी कळस . महाराष्ट्र हि संताची भुमी असुन पुणे जिल्ह्यातील देहु येथे ज्यांचा जन्म झाला असे महान संत तत्वज्ञान सम्राट,थोर संत तुकाराम महाराज. ज्यांनी निर्माण केलेलं तत्त्वज्ञान आज समाज उधराचा बीज मंत्र म्हणून उपयोगी ठरत आहे.तत्कलिन समाज व्यवस्था , व्यवस्थेकडुन झालेला प्रचंड त्रास सहन करत असताना आपल्या ईश्वर भक्ती शी प्रमाणिक रहात वेळ प्रसंगी कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आपलं धेय्य आणि साध्य गाठत लोक कल्याण हा मार्ग कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये न सोडता अंखड भगवंताचे नाम चिंतन करत लोकांना योग्य उपदेश करत भक्ति मार्गा मजबुत करत असताना वेळोवेळी अपमान ,पिडा,सहन करताना संत हे कधीच आपल्या कार्य पासुन विचलित होत नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक दर्जाचं तत्वज्ञान निर्माण करून या सृष्टीचा निरोप आजच्या दिवशी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी घेतला . त्या वैकुंठ गमन दिनास तुकाराम बीज असं पण संबोधलं जातं.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad