*स्त्री हि संस्कारांची जननी असुन संस्कृती ची निर्माती आहे*
स्त्री हि संस्कारांची जननी असुन स्वतंत्र अशा संस्कृतीची निर्माती आहे . जगातील सर्व पुरूष महापुरुष सिद्ध पुरुष घडले हे सहज नाही या मागे प्राकृतिक शक्ति सोबत स्त्रि शक्तिची ताकद कार्यरत होती म्हणूनच. शक्ति ममता माया क्षमा तपस्या आराधना करूणा ,हे सृष्टीच्या रचनेतील सगळ्यात सुंदर शब्द स्त्री वाचक आहेत अर्थात स्त्री हि किती महत्वपूर्ण आहे .याचा प्रत्यय या शब्दाचा अर्थ समजून घेतल्यावर येईलच .शिव-पार्वती, ब्रह्मा-सरस्वती, विष्णु-लक्ष्मी, श्रीराम-सीता, श्रीकृष्ण-रुक्मिणी हिंदु धर्मातील सर्व देव यांच्या नावासमावेत त्यांच्या पत्नीचे नाव आजही आदरपुर्वक घेतले जाते. हिंदु संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी मानले गेले आहे, स्त्रीचे महत्व पौराणिक आहे. हिंदु संस्कृतीमध्ये जेवढे महत्व देवांना आहे तेवढेच देवींना आहे मग ते हिरण्यकशपु या दानवाला मारणार्या भगवान विष्णुचा अवतार असलेल्या नरसिंहाला म्हणजे भगवान विष्णुला जितके महत्व तितकेच देवाला युद्धात त्रस्थ करुन सोडणार्या महिषासुर राक्षसाला फाडून काढणार्या माता दुर्गेला म्हणा देवांना जितके महत्व तितकेच देवींना महत्व हिंदु धर्मात दिले गेले आहे. मानवी कुळाची सुरुवात झाल्यापासून अयोध्येचे राजे दशरथ हे युद्धासाठी देव-असूर संग्रामात देवांच्या बाजुने सहभागी झाले युद्ध चालू असतांना राजा दशरथ यांच्या रथाचा आख तुटला त्यावेळी सोबत असणारी पत्नी कैकयीने आपल्या हाताने त्या रथाचा आख पेलला व महाराज दशरथ यांना युद्ध चालू ठेवण्यासाठी खुप मोठे सहकार्य केले दरम्यान युद्धात विजय मिळाला ते एका स्त्रीमुळेच.
लंकेवर विजय मिळवणार्या प्रभु श्रीरामचंद्र यांना सुद्धा युद्धाच्या अगोदर शक्तीची (देवीची) आराधना करावी लागली होती आणि शक्ती (देवी) प्रसन्न झाल्यानंतरच प्रभु रामचंद्राचा विजय सुकर झाला होता.
महाभारतामध्ये सुद्धा पांडव विजयी झाले, परंतु पांडवाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा द्रौपदीचा आहे. ज्यामुळे पांडवांचा विजय शक्य झाला. पांडव-कौरव युद्ध चालू झाले. कौरवांचे अनेक शुर-वीर दैनंदिन मारले जात होते यावर कौरवांचे युवराज दुर्योधन यांनी एकेदिवशी आपल्या सैन्यातील प्रमुख भीष्म पितामह यांना उद्देशून म्हटले की ‘तात तुम्ही मनापासून युद्ध लढत नाहीत का ?, यावर खुप सारी चर्चा झाल्यानंतर गंगापुत्र भीष्म यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळी सुर्यास्तहोईपर्यंत एकही पांडव जिवित राहणार नाही, ही भीष्माची प्रतिज्ञा आहे, माझा प्राण गेला तरी प्रतिज्ञा खोटी होणार नाही.’ यावर सदरची वार्ता वार्यासारखी पसरली पांडवाच्या सैन्यामध्ये दहशत पसरली. सर्व पांडव चिंताग्रस्त झाले. त्यादिवशी मध्यरात्री भीष्म पितामह साधनेत बसले होते आणि अचानक त्यांच्यासमोर एक स्त्री आपल्या तोंडावर पदर घेवून चरणस्पर्श करते आणि त्याक्षणी गंगापुत्र भिष्म यांच्यातोंडून एक वाक्य निघते ‘भरतुम प्रियभवतु’ (अखंड सौभाग्यवती भवतु) आणि भीष्म पितामहा डोळे उघडतात पाहतात तर समोर द्रौपदी. भीष्म पितामह द्रौपदीला समोर पाहून आश्चर्य मुद्रित विचार करता आणि आपण दिलेला आशिर्वाद आणि आपण उद्या केलेली भीष्म प्रतिज्ञा यामध्ये न्यायनिती धर्म संकट उभा राहिले आहे हे लक्षात येताच भीष्म पितामह द्रौपदीला विचारतात तुला या ठिकाणी कोणी पाठविले आहे त्यावर द्रौपदी नम्रपणे सांगते की भगवान श्रीकृष्ण पाठविले आहे. मग ते कुठे आहेत. त्यावर द्रौपदी ते बाहेरच उभे आहेत त्यावर भीष्म पितामह श्रीकृष्ण यांना मध्ये बोलावण्यास सांगतात आणि श्रीकृष्ण मध्ये आल्यानंतर भीष्म पितामह श्रीकृष्ण यांना विनंती करतात की मला माझ्या प्रतिज्ञेपेक्षा मी दिलेला आशिर्वाद, शब्द हा सत्य झाला पाहिजे हे महत्वाचे आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी मी मरण पत्करण्यास तयार आहे परंतू आपण मार्ग सांगावा आणि ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दुसर्या दिवशी अर्जुनाच्या बाजूला शिखंडी जो जन्मतः स्त्री होता आणि नंतर पुरुष झाला (याचे ज्ञात भीष्म पितामह यांना होते) आणि भीष्म हे स्त्रीवर शस्त्र चालवणार नाहीत त्यामुळे अर्जुनाच्या रथावर शिखंडी थांबवून अर्जुनाला सुचविले की भीष्म पितामह यांचा उद्या वध कर आणि याप्रमाणे एका स्त्रीच्या प्रचंड ध्येयशक्तीसमोर इच्छा मरण धारण करणारे भीष्मपितामह यांना शब्द पाळावा लागला व स्वतःच्या मृत्युचा युक्तीवाद त्यांनीच अर्जुनाला सांगितला आणि तेथूनच पांडवांच्या विजयाला कुठे सुरुवात झाली म्हणजे एका स्त्रीमुळेच महाभारतामध्ये सुद्धा पांडव विजयी झाले.
अगदी अलीकडच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भगिणी संत मुक्ताबाई यांनी लिहिलेले संत साहित्य वाचन करतांना आजही भल्या भल्या तत्वज्ञानी माणसांची बोबडी वळते इतके महान तत्वज्ञान कुठल्याही शाळेत शिक्षण न घेणार्या संत मुक्ताबाई यांनी लिहिले आहे. तसेच पुढच्या काळात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवणार्या राजमाता जिजाऊंचा दैदिप्यमान इतिहास संपुर्ण जगासमोर आहे नंतरच्या काळात महाराणी अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यासारख्या अनेक महान स्त्रीयांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाने जगाला स्त्री शक्तीची ओळख निर्माण करुन दिली आई. स्त्री ही कधी कमकुवत दुबळी नसते. स्त्री सुसंस्कृत असेल, उच्चशिक्षित असेल तर कुटुंब, समाज, राष्ट्र हे समृद्ध असतात, सशक्त असतात त्यामुळे स्त्रीही जगतजननी आहे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजमनाचा बदलला पाहिजे
*गणेश खाडे*
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ,महाराष्ट्र वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक
बालसंस्कार शिबीरअध्यात्मिक मार्गदर्शक
मो.9011634301