Bluepad | Bluepad
Bluepad
आळस चिंता दुःख अंहकाराची होळी करून नवचैतन्य निर्माण करण्याचा उत्सव शिमगा
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023

Share

*आळस चिंता दुःख अंहाकारची होळी करून नवचैतन्य निर्माण करण्याचा उत्सव शिमगा*
दुर्गुणांची होळी सद्गुण चा स्वीकार करा .आपल्या संस्कृती नुसार देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणारा शिमागा हा उत्सव पौराणिक परंपरेनुसार होलिका दहन करण्याचा उत्सव असला तरी त्यातली मुळ मुख्य भाव हाच आहे.कि आपल्या जीवनातील आळस, नकारात्मकता चिंता,निरूत्साह, दुःख,तणाव , द्वेष,राग, अंहकार,याची होळी करा . दुःख मुक्त व्हा चिंता मुक्त व्हा एक नवीन सुरुवात म्हणून स्वतः मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा निर्माण करा म्हणजे रंग उधळत चैतन्य निर्माण करा. सर्व दुर्गुण होलिकेत अर्पण करा .आणि ह्या बाबी आपल्या जीवतातुन काढुन टाकल्या कि आपोआप नवचैतन्य निर्माण होऊन आपल्या जीवनात एक वेगळं परिवर्तन होईल याच परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचा हा भव्य उत्सव म्हणजे होळी निसर्गाचा परिवर्तन या नियमानुसार कडाक्याची थंडी संपुष्टात येऊन जीवाची लाही करणा-या उन्हाळ्याची चाहूल देत निसर्ग आपलं रूपड बदलतो . बदलत्या निसर्गाच्या रूपाचे मानवी जीवनाच्या अनुषंगाने अनेक दृष्ट्या महत्व आहे. निसर्ग ज्या पद्धतीने स्वतः उन्हाळा हिवाळा पावसाळा याचा सुयोग्य मेळ घालतो आणि आपलं कार्य पुर्ण करतो त्याच पद्धतीच्या मानवाने सुद्धा आपल्या जीवनातील सुख दुःखांचा मेळ घालत आयुष्य पुढे नेताना निसर्गाकडून काही तरी शिकण्याची गरज आहे. आयुष्यातील दुःखांचा ओझ किती काळ डोक्यावर घेऊन मनुष्य फिरू शकतो त्याला पण एक मर्यादा असते . म्हणून निसर्गाने आपल्या सुंदर रचनेत अनेक आकर्षक बाबी निर्माण केल्या आहेत.त्याच वेळोवेळी आपल्या रूप दर्शन घडतं .जसं उन्हाचा तडाखा सगळीकडे लाहीलाही होण्याची सुरुवात होते . निसर्गातील सगळी हिरवळ संपुष्टात येऊन सगळीकडे फक्त मनात उदासीनता निर्माण होईल असं रूक्ष वातावरण आणि याच भायनाक वातावरणात सगळ्याच झाडांची पानगळ सुरुवात होऊन नवं पालवी फुटु लागते .आणि नेमका याच वेळी पळस या झाडाला सुद्धा एक एकही पान शिल्लक नसताना देखील पळस स्वतः नवचैतन्याच प्रतिक होत परिवर्तनाचा शिलेदार होत अगदी निसर्गाला आव्हान देत उभा असतो . तुझ्या दहकतेमुळे माझी पान जरी नष्ट झाली तरी माझी इच्छा शक्ती नष्ट झाली नाही .मी पुन्हा उभा राहतोय पान नसताना देखील फुलांना जन्म घालतोय हा नवा संकल्प घेऊन पळस निसर्गाच्या कुशीत प्रचंड प्रमाणात लाल रंगाच्या फुलांनसह सगळ्यांचं लक्ष आपल्या कडे आकर्षित करतो . या फुलांच्या घडामुळे हा डोंगर माथा सपाटा प्रदेश अगदी कडे एक चैतन्य निर्माण होते.आणि कड कड उन्हाळ्याची चाहूल लागली असताना देखिल एकटा पळस निसर्गाच्या सौंदर्यात भर घालत नवचैतन्य निर्माण करतो .दहक अशा उन्हाळ्याची जाणीव होऊ देत नाही.त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील आळस , दुःख, चिंता,तणाव याच दहन करून नवचैतन्याची होळी साजरी करण्याच पर्व म्हणजे शिमगा . निसर्गातील बहुतांश झाडांची पानगळ झालेली असताना देखिल नवीन पालवी फुटते म्हणजे नवचैतन्य निर्माण तसंच मानवी जीवन आहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दुःख कुठेतरी नष्ट करून पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात करण्याच पर्व म्हणजे शिमगा होळी उत्सव कडकडीत उन्हात सुद्धा झाड जीवन जगण्याची गोडी अजिबात कमी होऊ देत नाहीत.मग हिच मनुष्य का निसर्गा कडुन शिकणं आवश्यक आहे आणि आपल्या जीवनात आत्मसात करत सुख दुःखांचा मेळ घालत नवचैतन्य निर्माण करण्याचा उत्सव महोत्सव म्हणजे होळी . निसर्गातील परिवर्तनाचे माध्यम असणारा पळस त्याचा तो बहर आणि त्याच पळसाची फुले त्या फुलांचा प्रेरणादायी रंग लेवुन आपण आनंदी जीवनाची सुरुवात करतो .
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad