Bluepad | Bluepad
Bluepad
दृष्टी सात्विक असेल तर पाहण्याचा भाव आपसुकच निरपेक्ष असतो
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023

Share

*दृष्टी सात्विक असेल तर पाहण्याचा भाव आपसुकच निरपेक्ष असतो*
सार्वजनिक जीवनात आपण ऋषी तुल्य व्यक्तिमत्व अस कोणालाही संबोधत नाही. त्या साठी दृष्टी हि सात्विक आणि पाहण्याचा भाव हा निरपेक्षच असला पाहिजे.पण सध्या आपल्याला योग्य मुल्यमापन करता येत नाही हा पण कदाचित आपल्या दृष्टीचा दोष असेल .अनेक अनर्थ निर्माण करण्याची ताकद तसंच अनेक अनर्थ टाळण्याच सामर्थ्य हे आपल्या दृष्टी मध्ये असतं .जशी आपली दृष्टी तसं आपलं चारित्र्य असतं . चरित्र निर्माणातील महत्वाचा टप्पा असणारी आपली दिव्य दृष्टी हिच दृष्टी जर विकृत नसेल तर आपल्या नजरेस काहीही पडलं तरी पाहण्यतील भाव बदलतं नाही तसंच फार काही उल्लेखनीय फरक पडत नाही . पर्यायाने पुढील कार्य म्हणजे आपल्या मनातील विचारचक्र कार्यान्वित होत नाही . आपसुकच आपला भाव बदलत नाही.मानवी शरीराची रचना करताना भगवंतांनी खुप नियोजन बद्ध पद्धतीने दिव्यत्वाची पारख करण्यासाठी आपल्याला दिलेली दिव्य दृष्टी म्हणजे अनोखी भेट पण हिच अनोखी भेट याच महत्व आपल्या लेखी शुन्य असल्याने आपण आपल्या दिव्य आणि पवित्र दृष्टीचा वापर नको तिथे करतो मग हि दिव्य दृष्टी दिव्य आणि पवित्र कशी रहिल.तस पाहिल तर दृष्टीच्या पवित्र्याशी आपल्याला असंही फारस काही देणं घेणं नसतं. चक्षु आपल्याला का मिळाले याचा कधीतरी आपण विचार करतो का ? सृष्टीच उच्चतम सौंदर्य पाहण्यासाठी ईश्वराने मानवाला प्रदान केलेली दिव्य शक्ती म्हणजे दृष्टी .पण हिच दृष्टी आपण सृष्टीच उच्चतम सौंदर्य पाहण्यासाठीच वापरतो का ? आपण उच्चतम सौंदर्य न पाहता सृष्टी वरील जास्तीत जास्त निकृष्ट बाबी पाहण्यासाठी आपले दिव्य चक्षु वापरतो हे आपलं दुर्भाग्य आहे.आपली दृष्टी सात्विक असेल तर पाहण्याचा भाव देखिल निरपेक्ष असतो . दृष्टी हिच पाहण्याचा भाव आपली वृत्ती ठरवते . आपण आपल्या दृष्टीने एखादी बाब जेव्हा पाहतो अथवा आचनक आपल्या नजरेस एकादी बाब सहज दृष्टीस पडते त्या वेळी आपल्या दृष्टी मध्ये सात्विक वृत्ती असेल तर आपण कहिही पाहिलं तर फार फरक पडणार नाही. पण सात्विक वृत्ती नसेल तर मग आपल्या पाहण्याचा अर्थ आणि भुमिका खुप वेगळी ठरते . हिच भुमिका आपलं व्यक्तिमत्त्व पण प्रकट करते . व्यक्ती चांगला अथवा वाईट कोणीही थेट ठरत नाही.एखादया बाबीकडे पाहण्याचा आपला भाव कसा आहे म्हणजे दृष्टीकोन कसा आहे त्यानुसार आपली वृत्ती प्रकट होते. आपली दृष्टी सात्विक असेल तर पाहण्याचा भाव आपसुकच निरपेक्ष असतो.पाहणयाचा भाव सात्विक नसेल तर मग त्या मधुन आपल्या मनात विकृती तयार होते .हिच विकृती आपल्या मध्ये असणारा योग्य व्यक्ती आणि व्यक्तिमत्व नष्ट करते . एवढ्यावरच आपण थांबलो तर नशिब कधी कधी दृष्टीने निर्माण झालेली विकृती आपलं अथवा समोरच्याच जीवन उध्वस्त करते . कधी कधी तर उभ्यतांच जीवन उध्वस्त करण्यापर्यंतच काम असात्विक दृष्टी करते . मुळात आपल्याला मिळालेलं दिव्य चक्षु दृष्टी हि खूप पवित्र आहे.पण आपण या पवित्र दृष्टीने सृष्टी चे सौंदर्य पाहत नाहीत तर सृष्टी वर असणार्या दुय्यम निष्फळ बाबीकडे पाहण्याचा विक्रम करत आपण दृष्टी चे पवित्र्या हाळुहळु गमावतो . दृष्टी हि आपल्याला आपलं पवित्र्य वाढवून आपला उत्कर्ष घडविण्यासाठी तसंच निसर्गातील सर्वतम असं सौंदर्य नजरेत साठविण्यासाठी मिळालेली आहे.पण त्याचा सदुपयोग न करता दुरुपयोग करतो . सृष्टी वरील सर्व उत्कृष्ट सौंदर्य पाहण्यापासुन स्वतःला वंचित ठेवत . सदैव निकृष्ट वस्तू भोवती आपली दिव्य दृष्टी घोंगावत ठेवतो .हे खरंच दुर्भाग्य आहे.आपल आपल्या दृष्टीच आणि मानवी समुहाच.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad