Bluepad | Bluepad
Bluepad
आध्यत्म म्हणजे स्वतः मध्ये बदल घडविण्याचे ज्ञान अवगत करण
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
12th Mar, 2023

Share

*अध्यात्म म्हणजे स्वतः मध्ये बद्दल घडविण्याचे ज्ञान अवगत करण*
विषयाचं खरं मुळ सापडल्या शिवाय उत्कर्ष घडत नाही . आपण मुळ न शोधता वरकरणी खोटं खोटं समाधान शोधण्यात मग्न आहेत. खोट्या समाधानाल जास्त मोहित होन हेच मुळात दुर्भाग्य आहे.सुक्ष्म अति सुक्ष्म बाबी पासुन विराट आति विराट बाबी संदर्भात स्वतः मध्ये सार्थक बदल घडवून निसर्गाच्या रचनेतील सर्व चांगल्या बाबी आपण स्वीकारून त्याच कृतीशील आचरण केले तर अध्यात्मच सार्थक होईल. पण आपण सार्थक अध्यात्म करत नाहीत .तर निरर्थक अध्यात्म करण्यासाठी मात्र अटोकाट प्रयत्न करतो याला मानवी स्वभाव मानवी वृत्तीचा भाग म्हटलं तरी वेगळं ठरणार नाही.प्रत्येकाने स्वतःच कल्याण होण्यासाठी अगोदर प्रयत्न केला तर जगाचं कल्याण आपोआप होईल.पण असं होतं नाही.आपण स्वतःला सोडून जगाला शिकविण्यासाठी उतावीळ असतो . इथंच गडबड होते‌ .म्हणजे आध्यत्म हे आजुन तरी आपल्याला निट समजलं नाही अथवा कळलं नाही.असंच काहीसं गणित आहे आधी स्वतःकडे पाहिल पाहिजे.आत्म उद्धार आत्म ज्ञान जागृत केल पाहिजे. ज्ञान अवगत करून संसारीक दुःख वेदना याचा त्रास कमीत कमी कसा होईल आणि कर्म करताना प्रत्येक बाब सापेक्ष भावनेने कशी त्रयस्थ म्हणून पुर्ण करता येईल यासाठी स्वतःला घडवण म्हणजे आध्यत्म. आपल्या आजुबाजुला पाहण आणि तसंच आचरण करण हा मुळ मानवी स्वभाव असल्याने आपण खरया अर्थाने अध्यात्मापासुन वंचित रहतो. अध्यात्म या विषयावर अनेकांचं मत भिन्न भिन्न असु शकतं .ते असणं गैर नाही.पण अध्यात्म हे बाहेर जगात सापडणारी बाब नाही. कुठेही कितीही फिरल्यानंतर सापडणं शक्य नाही. स्वतः मध्ये आध्यत्मिक वृत्ती निर्माण करणं आणि स्वतःला घडवण म्हणजे आध्यत्म स्वतःला घडवताना आवश्यक असणार्या बाबीवर लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीने कार्य करण गरजेचे आहे. आध्यत्म म्हणजे नेमकं काय आहे याचा मुख्य गाभा जर आपल्याला समजला तर आपण इकडं तिकडं पाहण्या ऐवजी स्वतः मध्ये जास्ती जास्त काय बदल करता येतील . स्वतःला कस घडवता येईल यावर लक्ष केंद्रीत करतो .मुळ अध्यात्म समजलं तर इकडे तिकडे पळण्याची आवश्यकता भासत नाही. आपण जगभर फिरतोय आध्यत्मिक होण्यासाठी हेच आश्चर्य आहे. त्यात आणखी भर घालत इतक्यावरच न थांबता नानाविध प्रकार करत राहतो . प्रत्येकजण आप आपल्या ज्ञान बुद्धी नुसार अथाव सोयीनुसार अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम करतात त्याला नाव फक्त अध्यात्म असं गोंडस दिलं जातं. हे सगळे व्यर्थ प्रयत्न करून करून थकल्यावर सुद्धा आपण इतरांना याच मार्गाने जाण्याचा सल्ला देतो . म्हणजे किंती अजब गोष्ट आहे. स्वतः मध्ये बदल करण्याची साधना अध्यात्म शिकवतो .पण आपण याला उलटं स्वीकारतो स्वतः मध्ये बदल करण्याचं बाजुला ठेवून आपण इतरांना बदलण्यासाठी प्रयत्नशील असतो . मुळात हा चुकीचा प्रयत्न मग चुकीचा प्रयत्न यशस्वी तो कसा होईल. निसर्गातील सकारात्मक उर्जा सदैव आपल्या मध्ये साठविण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती तथा नकारात्मक उर्जा या पासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी अध्यात्म सदैव उपयोगी ठरत .पण खरं अध्यात्म समजलं तर म्हणून खरया अर्थाने अध्यात्माची समज उमज आपल्याला झाली तरच आपल्याला जीवनात त्याचा सार्थक उपयोग होतो. पण खरं अध्यात्म समजण्याची आवश्यकता वाटत नाही हे वेळेचं काळच गणित असलं तरी अंतिमतः या मध्ये होणार नुकसान तर मानवी समुहाचे आहे. स्वतः पासुन कोणतीही सुरुवात केली तर ती उपयोगी व यशस्वी ठरते . अध्यात्माच पण कहिस असंच आहे.आपण स्वतः आध्यत्मिक झालो तर इतर सर्व हळूहळू याच मार्गाने मार्गक्रमण करतील . यामध्ये शंका कुशंका अजिबात नाही.आवशकता आहे ती फक्त स्वतःला समजण्याची तसंच स्वतःपासून प्रारंभ करण्याची गरज आहे.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad