तुज सह घेतली होती कधी अशी नभ भरारी. आयुष्यातील सुख, दुःख बांधुन उराशी तु तर घेतलीस देव प्रागंणात दुर, खुप दुर भरारी. नाही केला विधात्या ने माझा विचार जराही ! ये ना पुन्हा परतुनी, 25मार्च ला स्मृती शलाके ची पालखी ठेविली मी सजवुनी, प्रिय तुज खर्डा भाकरी करीन आवडीनें. पुन्हा तुझ्या सह मारायची आहे मज दुर दुर नभ भरारी.