Bluepad | Bluepad
Bluepad
अधिकार...
Manisha Wandhare
Manisha Wandhare
11th Mar, 2023

Share

जेव्हा हक्क मागितला मी ,
माझ्या स्त्री होण्याचा ,
दुनियेने डोळे विस्फारले ,
म्हणाली ही काय ? रीत झाली ,
सांगा मला का ?हक्क नाही जगण्याचा ,
हो हा अधिकार हवा मला ,
मी स्त्री होण्याचा ...
पदर होता आज नाही ,
पैजंण घातले ते आता नाही ,
चुल पेटली माझ्या हाताने ,
आता शिक्षण आले खरे ,
नऊवारी सोडून जीन्सचे पगडे ,
तरीही ओठावर हसू असताना ,
ओले डोळ्याचे कोपरे ,
आवाज उचलला मी ,
माझ्या स्त्री होण्याचा ,
दुनियेने डोळे विस्फारले ,
म्हणाली ही काय ? रीत झाली ,
सांगा मला का ?हक्क नाही जगण्याचा ,
हो हा अधिकार हवा मला ,
मी स्त्री होण्याचा ...
तू माझा अविभाज्य अंग ,
मला तुझ्या सवे ना वादाचा संग ,
प्रेम आपल्यात मग का ? हा दूजाभाव सख्या ,
जो हक्क तुझा त्याच माझ्या हक्कावर गदा ,
समजून घ्या मनाची ही अवस्था ,
उंचावली मी मान जेव्हा ,
हक्क मागितला मी ,
माझ्या स्त्री होण्याचा ,
दुनियेने डोळे विस्फारले ,
म्हणाली ही काय ? रीत झाली ,
सांगा मला का ?हक्क नाही जगण्याचा ,
हो , हा अधिकार हवा मला ,
मी स्त्री होण्याचा ...

0 

Share


Manisha Wandhare
Written by
Manisha Wandhare

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad