मज शोधत आले माझे सदगुरू राय.
गुरू माझे दैवत,गुरू काशी क्षेत्र.
आत्मसाक्षत्काराने मज भेटली माय.
सुवर्ण अक्षरी लिहिलेले हे गुरुचरित्र.
गुरू दत्ताने चोविस गुरू ते केले.
साऱे देवत्व मज गगनगिरीत दिसले.
गेले होते, मैत्रिणीसह कार्ला देवीला.
येता सहज पाय खोपोलीला वळले.
निघताना घेतला फोटो बाबांचा.
जाईना वेळ नामस्मरण थोडा केला.
पहाटे प्रहरी मंत्रपुष्पांजली ती कानी.
दिव्यत्व प्रचिती साक्षात्कार दाखविला.
हृदयी सुवर्ण अक्षरी तोच गुरु केला.
गुरूभक्ती करण्याचे मार्ग दाखविला.
सुगंधी परिमळत नानाविध भेटला.
धडा पारायण, नामस्मरण शिकविला.
किती पुजावा देव?असा सुवर्णकाळ.
काय लिला थोर, कानात मंत्र घोष.
दोन पावली देव,ना हाक मारण्या वेळ.
चाले दिन रात्र, गुरू शिष्यांचे जयघोष.
श्रीमती संजना सुनिल कामत ( मुंबई)