आज रस्त्याने चालतांना सहजच एक विचार आला काय आयुष्य आहे त्या आजोबांचं मस्त मैदानात येतात मित्रानं बरोबर बोलतात ,कवायत करतात आणि घरी गेलं की मग त्यांचा संपूर्ण वेळ एकदम निवांत परिवार सोबत घालवतात. काय वेळेचं बंधन नाही त्यांच्यावर कुठलं.दुसऱ्या दिवशी रस्त्याने जात असताना त्याच वयोवृद्ध व्यक्तीचा तोल गेला आणि ते खाली कोसळले त्यांना मी विचारणा केली काय आजोबा कसली आली घाई आणि आज मित्रांना सोडून इकडे कस काय ? त्यांनी हसतं उत्तर दिलं अरे त्या धावत्या तरुणाला बघून मला माझं तरुण्यापण आठवलं म्हणून मीही पळाव अशी इच्छा झाली आणि पडलो बघ. त्यांना बाकावर बसवून मी त्याच्या सोबत गप्पा मारायला लागलो.अरे तुमच्या तरुण मुलांच भारी आहे बघ मनसोक्त फिरायचं , खाण्यावर काही बंधन नाही , खूप आनंद आहे रे तुमच्या जीवनात! खरच संधी मिळाली ना तर पुन्हा एकदा तरुण होईल बघ! असं ते मला उद्देशून म्हणाले. मीही हसत विचार केला अरे काय हे? आजोबांना का हवं आहे तारुण्य? तारुण्य म्हणजे एक भटकंती मन, ज्याला प्रत्येक वेळी आपल्या भविष्याची काळजी सतावते , जीवन संघर्षमय तर आहेच पण हे जग आपल्या जीवावर बेतल आहे का? हे पावलो पावली जाणवते , कुटुंबा सोबत वेळ घालवता येत नाही , कामाचा ताण ,पण यातही आपल्यांच्या सुखाची जाण.एवढं सर्व ओझं असूनही का हवं तारुण्य असा परत प्रश्न मी त्यांना केला! आजोबा म्हणाले अरे डॉक्टरांनी घालून दिलेल्या अटींप्रमाणे जगावं लागतं बघ! हे खा, ते नका खाऊ आमक करा-तमक करा. आणि आजारा मूळे गोळ्यांचा ताण हा तर वेगळाच. सोड! निघतो आता म्हणून. तारुण्य पण जगून घे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे असा सल्ला देत ते निघून गेले .याच गोष्टीचा क्षणभर विचार करत मला जन्म आणि मृत्यू मधील जगन कळलं. एक थकलेला तरुण म्हणून मला त्या वृद्धाला बघून आनंद होत होता की किती छान हे यांचं आयुष्य आणि त्याच वेळी त्या आजोबांना तारुण्य पणात दिसणारा त्यांचा भूतकाळ जो त्याना त्या क्षणी आनंद देणारा होता.या विरोधाभासी घटनेवरून मला एक गोष्ट लाख मोलाची कळली, की व्यक्तीच्या वाढत्या वया नुसार आनंद आणि सुखाची व्याख्या सुद्धा बदलते . पण खरी गंमत तर ही आहे की आहे त्यात समाधान मानून जगन सुखकर करण्यावर माणसाने भर द्यायला हवा. आणि आहे त्या जगण्याला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे म्हणून जगावं. एकंदरीत जगणं म्हणजे काय असतं? नको पैशांचा लोभ, नको श्रीमंतीचा मोह असो जगण्यात समाधान ज्यात दिसावा मज स्वर्ग.
✒️शब्द:अ.श.गवळी🥀