आज माझ्या चपलेचा आंगठा तुटल्या मुळे मी घरी येतांना चांभार कुठे दिसतो का म्हणून शोधत शोधतच घरी पोहचलो पण १५ किलोमीटर पर्यंत तरी मला चांभार कुठे दिसला नाही,
साहजिकच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले, की साधा चांभार मिळणे मुश्किल झाले आहे काय कारण असावे बरे,
त्याचे कारण म्हणजे उच्च शिक्षण
आज प्रत्येक जण आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून झटत असतो, आज आपण बघतो आहे की गोरगरिबांची मुले देखील उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर विराजमान झालेली दिसतात,
आज सर्वानाच ही छोटी छोटी कामे करणे कमीपणाचे वाटते आहे,
पुढील ५ ते १० वर्षांमध्ये काय परिस्थिती ओडवेल त्याचे चित्र डोळ्यासमोर आणल्यास, आपल्याला दिसते की ,ही जी लहानसहान काम करणारा जो वर्ग आहे, तो खुप कमी झालेला असेल किंवा दिसणारच नाही,
तेव्हा किती हालअपेष्टा ना तोंड द्यावे लागेल,
कालांतराने चांभार, लोहार,मोलकरीण हा वर्ग खूप कमी झालेला असेल यात तीळमात्र शंका नाही, जे कोणी शिल्लक असतील त्यांना खूप मागणी असेल ही वस्तुस्थिती आहे
मनोज कांसारा