काल माझ्या ब्लॉग वर बऱ्याच जणांनी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार.. काहींची मतं मांडण्याचा छोटासा प्रयत्न.
हल्लीच मी साई ताम्हणकर आणि वैभव तत्ववादी ह्यांचा ' पेट पुराण ' बघितला लग्नाला पाच वर्ष झाली आता मुलं होवू द्या म्हणून मागे लागलेले आई बाबा आणि मुलांच्या ऐवजी कुत्रा आणि मांजर पाळली तर...त्यांचं नीट पालन पोषण केला की आम्ही मुलांचं पणं नीट करू शकू...ही (फालतू) आयडिया ते दोघं आईबाबा समोर मांडतात...ते पणं ' हो ' म्हणतात...मी असती तर विचारलं असतं...' माणूस आणि प्राणी ह्यांच्यात काहीतरी फरक आहे की नाही? तुम्हाला आम्ही कुत्री मांजरा सारखं वागवलं का??? त्यांची lifeline आणि माणसाची ह्यात खुप फरक असतो.... तुम्हीं उद्या आजारी पडलात तर कोण तुम्हाला हॉस्पिटल किंवा डॉक्टर कडे घेऊन जाईल? तुमचं मुलं का तुमचे पेट???? परत सोसायटी वाल्यांना त्रास तो वेगळा...कारणं ही रात्रि अपरात्री कधीही भुंकायला सुरूवात करतात.( असं ऐकलंय आमच्या मालवणात की त्यांना अपरात्री भूत दिसतं मग ते भुंकायला सुरूवात करतं...) आम्ही तर ह्या भीतीने डोक्यावर पांघरून घेऊन झोपून जाऊ...मग भले ती चोर आलेला असू दे....
एकीने सांगितलं ' माझा लेक लग्न झाल्यावर सूनबाईने सांगितलं म्हणून कुत्रा घेऊन आला.... पहिली कौतुक झाली सकाळीं त्याला फिरवायची.... ह्या कुत्र्यांना फिरायला बाहेर काढलं की ते सुसाट धावत सुटतात...त्यांच्या बरोबर मुलगा असेल तर ठीक पणं माझ्या नवऱ्याला त्याला घेऊन जावं लागलं... त्याला कुत्र्याला आवरता आले नाही आणि तो पडला...त्याला त्या कुत्र्याने एक किलोमीटर घासत नेलं, पूर्ण पाठ सोलावटून गेली...पणं त्यांच्या लक्षात आलं नाही की बेल्ट सोडायचा....( हे आपलं पोरगं असतं तर ओरडून थांबवलं असतं )... आलिया भोगासी असावे सादर.... सूनबाईनी सांगितलं ' मला कुत्रा नकोच होता ह्याने जबरदस्तीने आणला घरी '... बोला आता.. आपलेच दात....
करोना मध्ये सुरुवातीला अशी बातमी पसरलेली कि ' हा रोग प्राण्यां मुळे होतो' बऱ्याच लोकांनी त्यांचे पाळलेले पेट रस्त्यांवर सोडुन दिले ( अचानक त्यांचं प्रेम आटल... स्वतःच्या जिवापेक्षा मौल्यवान काही नाही)... ह्या प्राण्यांच्या अंगावरचे बारीक केस सगळीकडेच पडलेले असतात...डॉक्टर नेहमी दमा किंवा खोकला सर्दी बरेचं दिवस राहिला तरं पहिला प्रश्न हाच विचारतात की घरात पाळीव प्राणी आहे का? तेच केस पंख्याबरोबर उडून आपल्या नाकातोंडात जातात ज्यामुळे श्वासनलिका ब्लॉक व्हायला सुरुवात होते. लहान मुलांना यांच्यापासून धोका असतो, पणं हल्ली छोट्याश्या मुलांना पणं खेळायला म्हणून हे पेट घरात आणले जातात...त्यांच्या क्लिप्स काढल्या जातात.... काल एक क्लिप बघितली एका बाईने प्रयोग म्हणून एका डिश मधून मांजरीचे खाण घेऊन येते आणि चक्कर येऊन पडल्याचे नाटक करते... मांजरी सगळं पडलेलं खाण खातात, तिच्या हाताखाली काही दाणे असतात ते पणं हात बाजुला करून खातात...त्यांना ती पडल्याच काही वाटतं नाहीं...हेच ती बाई तिच्या पाळीव कुत्रा समोर पडते, तो खाण्याला हात लावत नाही, सतत तिला हलवत राहतो, भुंकत राहतो... इमानदार प्राणी.
एकीने पोपट पाळला, कौतुकाने त्याची पापी घ्यायची, लाड करायची, एकदा त्याच्या चोचीला आपले ओठ लावले...त्याने चावले फक्त.... प्लास्टिक सर्जरी खर्च लाखोत आला.. फक्तं....( प्रेम हे प्रेम असत... तुमचं आमचं सेम नसतं...).
🙏 वंदना ❤️