सुरज घरी येतो आणि सोफ्यावर बसतो आज माहित नाही का त्याला अस्वस्थ वाटत होते .तो काही तरी विचारात असतो तोच घराची बेल वाजते आणि तो दरवाजाच्या दिशेने जातो दरवाजा उघडतो तर एक व्यक्ती एक छोटी बॅग सूरज च्या हातात देऊन तिथून काहीही न बोलता निघून जातो .सूरज विचारात पडतो व त्या बॅग मध्ये काय आहे ते पाहतो तर त्यात त्याला एक डायरी मिळते तो ती घेऊन घरात येतो व ती डायरी वाचायला सूरवात करतो .
पान पहिलं
कसा आहेस तू ,कसं किती आणि कुठून सांगावं कळत नाही .आपण भेटलो तेव्हा चा तो क्षण आणि आज असंख्य बदल होऊन गेले तुझ्या माझ्यात, सभोवतालच्या वातावरण नात .पण आजही जर काही बदललं नसेल तर ते आहे आपल प्रेम आजही तसच तेवढंच, किंचित जास्त झालं असेल कारण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीची किंमत ही दूर गेल्यावर कळते . किंमत तर कळली रे मला तुझी पण त्या साठी दूर जाणे हे खुप महागात पडले मला . 2 वर्ष झाले आपण भेटलो नाही ना एक कॉल ना मेसेज तरीही किंचित मात्र प्रेमात फरक पडला नाही आहे . आजही पहिल्या भेटीत तू घातलेला पांढरा शर्ट आठवतो रे मला ,मिळालेली आपली पहिली नजर आणि तेव्हाच झालेला मंदिराच्या घंटीचा गजर काय योगायोग होता तो . आजही मंदिरात गेली की अलगद चेहऱ्यावर हसू येऊन जाते .का रे का सोडून गेलास रे तू मला , सॉरी मला माहीत आहे तुझी शेवटची अट होती की हा प्रश्न मी तुला कधीच नाही विचारायचा पण आता नाही राहवलं म्हणून विचारलं . बरं हा विषय म्हणजे दुधात मिठाचा खडा जणू. तुला आठवते का जेव्हा तू मला पहिल्यांदा फुल दिलं होत किती लाजत होता ना तू फुलं देण्यासाठी तोच त्या डायरी तून सुकलेल एक फुल खाली पडते ते त्यांनीच दिलेलं पहिलं फुल होत.पाणावलेल्या डोळ्यांनी पुढे वाचायला लागतो आज ना मी बागेत गेली होती तिथे झुल्यावर एक मुलगी बसली होती तिला पाहून मलाही आपली बागेतली मस्ती आठवली किती मज्जा करायचो ना आपण कुठेही गेलो की नुसती मस्ती आणि तेवढ्यात फोन ची रिंग वाजते आणि सूरज डायरी बंद करून फोन घेतो.
भाग १