तांबडया मातीत गवताचं झाल सोन
उघड्या कातळाला नाही उन्हाचे ही भान
खोली दरीची पहायला जणू वाहते ही वाट
चमकते पांढुंरकी काय सांगावा हा थाट
वाऱ्याच्या झोतावर निलगिरी हळू डूले
निळ्या आभाळात जणू वारा बांधी झुले
गर्द. झाडाची हिरवाई पाना पानात दाटली
नाही कोठेही सावली अशी माया का आटली?
उन्हा सवे भास होई जणू चांदण्याची ही शिंपण
चित्रकाराच्या नावाचे हिरव्या रानाला कुंपण
लता चव्हाण सातारा