Bluepad | Bluepad
Bluepad
मुलांची तुलना करणे सोडा
Ankush Dhobale
Ankush Dhobale
1st Mar, 2023

Share

आजच्या दैनंदिन जीवनात आपण इतरांशी नेहमी तुलना करत असतो. त्याच्याजवळ किती पैसा आहे, त्याचा घर किती मोठा आहे ,त्याच्याजवळ किती महागडी कार आहे, त्यामुळे आपण नेहमी दुःखी जीवन जगत असतो इतरांशी तुलना करण्यातच आपला बहुतांश जीवन गेलेला असते. तुलना फक्त घर, पैसा,कार या गोष्टीची नाही तर ती गोष्ट आपण आपल्या घरातील आपल्या मुला-मुलीवर लागू पडते. आपले आई - वडील देखील आपली तुलना इतर मुलांशी करतात.तो बघ देशपांडे चा मुलगा प्रथम आला, त्याला दहा वीत 98टक्के मार्क पडले आणि तुला फक्त 60 टक्के मार्क तू तर एकतच नाही बाबा आमचं! सारखं मुलांना आपण टोमणे देतो पण खरंच तुलना करणे योग्य आहे का हो? त्या मुलांमध्ये खूप काही फरक असू शकतो काही गोष्टीत हा 60 टक्के मिळालेला मुलगा त्या 90 टक्के मुलाला मागे टाकू शकतो हा मुलगा - मुलगी उत्कृष्ट खेळाडू असू शकतो,उत्तम लेखक असू शकतो ,तो उत्तम चित्रकार असू शकतो तो गायक असू शकतो असे अनेक गुण असू शकतात. पण,आपण आपल्या विचारांची सुई मात्र त्या ६० टक्के वरच जाते.दुसऱ्या मुलाने दहावीनंतर विज्ञान शाखा घेतली असेल तर आपणही आपल्या मुलाला विज्ञान शाखाच घे असा हट्ट करतो.पण आपण त्या मुलाची आवड त्याची रुची कशात आहे हे जाणून घेत नाही व नकळत तो मुलगा नैराश्यात जातो. त्याला सगळीकडे आता अपयश आलेले असते तो आता कुठेतरी मागे पडलेला असतो. तो जीवनाच्या स्पर्धेत टिकतच नाही. त्यामुळे त्याला स्वतःवर आत्मविश्वास राहत नाही आणि तो नेहमी दुखात आपल्याला दिसत असतो. खरंतर ,आपल्या आई - वडिलांनी मुलाला स्वतःचे करिअर निवडायची मुक्तता द्यायला हवी. त्याच्यासमोर कसलाही प्रकारची करिअर निवडताना दडपण असायला नको. त्यामुळे तो मुलगा व मुलगी आपल्या जीवनामध्ये नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही यात तिळमात्र शंका नाही. तो आपल्या प्रयत्नांनी यशाची शिखर गाठेल तो स्वतःची व स्वतःच्या आई-वडिलांचे नाव नेहमी उंच उंच करेल. आणि सगळ्यात महत्वाचं तो स्वत: हे सगळ आपल्या कर्तृत्वाने साध्य करेल. म्हणून आपल्या मुला- मुलीला दुसऱ्या मुला- मुलींशी तुलना करणे सोडावे .
अंकुश रा ढोबाळे

1 

Share


Ankush Dhobale
Written by
Ankush Dhobale

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad