अलक कथा:
|| एका दिवसाच आयुष्य ||
आयुष्याने म्हटलं, मी तुला एका दिवसाच आयुष्य देतो आणि एक फुल एका दिवसासाठी फुललं,सुगंधान दरवळलं.वार्यावरती झुललं.कुणाचं नेत्र सुखावलं,कोणी हळुवार स्पर्श केल तर कुणी फुलांमधलं मध घेऊन गेल.फुल संध्याकाळी सुकुन, तुटुन,मरुन गेलं.एका दिवसाचं जगणं आनंदान जगुन गेलं.
अलककार:विशु ईश्वर, सोलापूर