भूतदया हा शब्द आम्ही लहानपणापासून ऐकलंय म्हणजे ' प्राणी पक्षी ह्यांच्यावर प्रेम करणं '.. ... माझ्या शब्दात जरा दुरूनच प्रेम करणं.... कारणं मला प्राणी ह्या पंथातले कुत्रा आणि मांजर हेच, ज्यांच्यावर काही लोकं अपार प्रेम करतात ते बघून आश्चर्य वाटतं, स्वतःच्या मुलांवर पणं एवढंच प्रेम केलं असेल का? हा पडलेला प्रश्न. अगदी सतत त्यांच्या पाप्या घेणं त्यांच्या गालाला गाल घासणे, त्यांना बेडवर कुशीत घेऊन झोपणं... वैगरे वैगरे..
परवा एक लेख वाचला एका माणसाला एक दिवस खुप ताप आला मगं हळू हळू त्याचे पाय काळे पडायला लागले, पायांना कंप सुटला... डॉक्टरनी भरपूर टेस्ट केल्या तेव्हा त्याला रेबीज हा कुत्र्यांना होणारा रोग झाल्याचं कळलं....मग चौकशीत त्याला हाताला खरचटलेल त्यावर घरच्या पाळलेल्या कुत्र्याने चाटल आणि त्याच्या लाळेतून हा रोग ह्या माणसाला झाला...सहा महिने त्याला बर व्हायला लागले... तरीहि त्या कुत्र्याला इंजेक्शन पासून सगळी treatment दिलेली...म्हणून कमी वेळ लागला असं डॉक्टर म्हणाले....
परवा मैत्रीणीकडे गेली तिच्या घरी पोमेरियन...त्याला स्वेटर, दोन साईडला केसाचे बो, त्याला मॅचींग क्लिप्स लावलेल्या, सगळं छान वाटतं होत पणं लांबूनच.....मी बोलली ' पहिलं त्याला बांधून ठेव मगच मी घरात येऊन..' ह्यांचं कुत्रं पणं आपल्याला नख जरी लागलं तरी उगाचंच चौदा ( आता तीन झालीत) पोटात...एवढी भूतदया माझ्याकडे नाही आहे बाबा.
काल एक किस्सा ऐकलला, नविन सूनबाई घरात येताना रस्त्यावरून एक क्यूट दिसणारं मांजर घेऊन आली, नविन लग्न झालय, सूनबाईना काय बोलणारं... सासुबाई गप्प. मग कळलं की ती मांजर गरोदर आहे...मग तिला बेडवर स्थानापन्न झाली...तिचे लाड... वर्क फ्रॉम होम करता करता सूनबाई आणि लेक करायला लागले. घाण केली तर साफ सासुबाई करतील, कारणं हे लोकं work from home... त्या मांजरीला चार पिल्ले झाली, आता मुलाच्या बेडपासून बाहेरच्या सोफ्यापर्यंत धुडगूस चालु झाला आणि सासूबाईंनी फर्मान काढले, ' तुम्ही वेगळे रहा....वाटलं तर जेवायला माझ्याकडे या...पणं ह्या मांजरीला घेऊन वेगळे रहा '. सूनबाईनी सांगितलं ' त्यापेक्षा तिन बेडरूमचा ब्लॉक भाड्याने घेऊया... मांजरीला पणं एक बेडरूम देऊया...सगळे एकत्र रांहूया ' .....बोला आता... आईला मुलं नकोत मांजरीमुळे, पणं सून बाईना आणि लेकाला..... ना सासुबाई सोडवत...ना मांजर. ' करे तो क्या करे... दुनिया ही ऐसी हैं '.
आमच्या वेळी दोन.. तीन किंवा चार मुलं सांभाळताना मारामारी होत असे, ते कुत्रे मांजरी काय सांभाळणार..मग एकटे मुलं जेव्हा घरात आले तेव्हा त्याला जोडीदार म्हणून कुत्रे मांजरी फॉर्म मध्ये आले...त्यांची डिमांड वाढली...अजून एका मुलाचा चान्स घेण्यापेक्षा कुत्रं सांभाळलेले बरे...हे विचार...आणि त्यांची वाढलेली किँमत...एक लाख ते सव्वा लाख पर्यंत कुत्रे...मग त्यांचं तेवढंच महागड खाण...त्यांचे डॉक्टर, इंजेक्शन्स, त्यांचे ट्रेनिंग.....मला वाटतं ह्यापेक्षा मुलाचा चान्स परवडला असता... तो निदान बोलला तरी असता की मला तुमच्या ह्या प्रेमाचा त्रास होतोय...किंवा जरा बाहेर पणं जाऊ दे... मित्रात मिसळायला... सतत तुम्हाला बघून कंटाळा आलाय.... वैगरे वैगरे...
( अश्या वेळेला खरंच माझी भूतदया जागृत होते)...... फॅन्सी गळ्याच्या पट्ट्यात बांधलेले ' ते ' आणि वेळ मिळेल तसा त्याला खाली फिरवायला नेणारे ' हे ' ...नाही जमलं तर घराच्या बाथरूम मध्ये कसं जायचं, बॉल कसा पकडायचा पासून ट्रेनिंग देणारे ट्रेनर.....त्यात गुरफटलेला हा मुका जीव.... त्यांच्या जिवात गुरफटलेले बोलके मानव....
🙏 वंदना ❤️