मागायचे होते
खुप काही तुला
तेव्हाचं तु
निघून गेलास्
एक दिवस
वळवाचा पाऊस
होऊन आलास्
भिजवुन माझ्या
मनास गेलास्
शहारले अंग माझे
शिरशिरी भरली मनाला
ओले चिंब झाले मी
आठवत बसले
त्या दिवसाला
असा बरसला पाऊस
डोळ्यांतुन गालावर आला
आठवांत तुझ्या तो
पुरात वाहून गेला.................
®रजनी निकाळजे
(शब्द रजनी )