प्रतिष्ठेचा विदर्भ गौरव पुरस्काराने गजानन हरणे सन्मानित. अकोला.............................. स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील समाजसेवक तथा निर्भय बनो जनआंदोलनाचे संयोजक गजानन ओंकारराव हरणे यांच्या तीस वर्षाच्या निस्वार्थ समर्पित सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना दर्पण पत्रकार, संपादक फाउंडेशन व पोलीस टाईम 24 यांच्या वतीने नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मोर भवन येथे सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा विदर्भ गौरव पुरस्कार 2023 देऊन वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या अध्यक्ष खाली व प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रशांत भगत समाजसेवक, मराठा महासंघाच्या विदर्भ अध्यक्ष श्रीमती कविता भोसले, समाजसेविका मायानंद तिवारी, जूनियर अमिताभ बच्चन अमित
जी सोनी, दर्पण पत्रकार संपादक फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष सुशीलजी पांडे, राष्ट्रीय सचिव संजय तिवारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश शुल्का, पोलीस टाईम चे मुख्य संपादक राजेंद्र पाठक, आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांना विदर्भ गौरव पुरस्कार 2023 मानपत्र , सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. या अगोदर सुद्धा गजानन हरणे यांना त्यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन 100 च्यावर पुरस्कार मिळालेले आहेत .त्यामध्ये केंद्र शासन ,महाराष्ट्र शासन तसेच विविध सामाजिक संस्था संघटनेच्या वतीने त्यांना त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवाभावी ,त्यागमय, समर्पित भावनेने केलेल्या सामाजिक कार्याची तीस वर्षातील केलेल्या सामाजिक कार्या त्यामध्ये माहितीचा अधिकार, लोकआयुक्त, भ्रष्टाचार निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता अभियान, युवक युतीच्या क्षेत्रात केलेले भरीव कार्य, शोध पत्रकारिता, शेतकरी, कामगार, महिला, बचत गट, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या समर्पित कार्याची दाखल घेऊन त्यांना प्रतिष्ठेचा देण्यात येणारा 2023 चा विदर्भ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या निवडी बद्दल व विदर्भ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण विदर्भामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक सामाजिक संस्था, संघटना समाजसेवक, पत्रकार,राजकीय लोकांनी त्यांचे विदर्भ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
निर्भय बनो,निर्भय बनो ,निर्भय बनो.