Bluepad | Bluepad
Bluepad
जगाचा विस्तार हा आपण आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार ठरवतो हेच अदभुत आश्चर्य
गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
1st Mar, 2023

Share

*जगाचा विस्तार हा आपण आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार ठरतो हेच अदभुत आश्चर्य*.
आपण आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार जगाचं मुल्यमापन करत असल्याने बहुतांश वेळा त्यातील मुळ अर्थ बोध प्रकट होत नाही . आपण जसे आहेत अथवा आपल्या मध्ये जे तत्व अंतर्भूत आहे आपण तसाच बोध निर्माण करणार मग मुळ अर्थ बोध प्रकट होत नसल्याने आपण चुकीचा अर्थ बोध घेऊन फिरतो या मध्ये मग आपलं वैचारिक नुकसान होत. बोध हा उच्चतम घेण्यासाठी जगाचा विस्तार कोणी कसाही करो सत्य मध्य आपण शोधला पाहिजे. सत्य मध्य शोधल्यावरच तो बोध अर्थ आपण स्वीकारला पाहिजे अथवा इतरांना सांगितला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती त्या त्या क्षेत्राच मुल्यमापन करताना आपल्या ज्ञान बुद्धी सामर्थ्य नुसार करत असतो . परंतु श्रोता म्हणून अथवा रसिक जगारूक नागरिक म्हणून आपण योग्य मुल्यमापन करणं गरजेचं आहे.अथाव योग्य बोध काढणं गरजेचं आहे.जग किती मोठं तर ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमते एवढं आपण असं सहज बोलतो .प्रसिद्धी आणि किर्ती याच्या मध्ये अंतर असतं प्रसिद्धी क्षणिक तर किर्ती अमर असते. साध्या स्वतः जाणुन घेण्याची क्षमता फार कमी लोकांकडे आहे. प्रत्येक जण जाणुन घेण्या ऐवजी ऐकण्या ऐवजी मार्गदर्शनासाठी उभा आहे.याच स्पर्धेत सत्य कोसो दूर बाजुला पडले आहे.जगाचा मुळ विस्तार हा अनंत असला तरी आपण आपल्या ज्ञान सामर्थ्य नुसार जगाचा विस्तार ठरविण्यासाठी अतुर असतो . आपण फक्त विस्तार ठरवयावर थांबत नाहीत तर जग असंच आहे असं ठासून सांगतो हा सृष्टी वरील सगळ्या मोठा विनोद आहे.पण मुळ विनोदाचे निर्माते आपण हे सगळं शतप्रतिशत खरं आहे असंच वावरतो.मुळ ज्ञान तत्वज्ञान हे जरी नाही सांगता आलं तरी चालेल पण अर्धसत्य सांगता कामा नये.क्षणिक प्रसिद्धी हा आचाट शत्रू आहे तो एकदा का मानगुटीवर बसला कि आपला पिच्छा सोडत नाही थांबता थांबत नाही. मग या सुसाट वेगात आपण केलेला जगाचा विस्तार आपण इतरावरही लादणयाचा प्रयत्न करतो .या धावण्याच्या शर्यतीत आपण आपल्या सह अनेकांचं नुकसान करतो . पण हे नुकसान होत आहे याची खंत परवा आपण अजिबात करत नाही. वास्तविक खरं जग हे वेगळं असतं आहे . त्या पैकी आपण किती पाहिलं आहे हे आपल्या अनुभवा वरून ठरत .आपण जितके पहिल तितक्यात आपण जग विस्तार करतो . म्हणून जगाच्या कल्पने विषयी असणार प्रत्येकाच मत वेगळं असणार या मध्ये शंका नाही .ज्यांच्या कडे जितकी ज्ञान संपदा आहे .त्याला जग तितकंच समजणार दिसणार म्हणजे जगाचा विस्तार हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार ठरतो .जग हे अनंत आहे त्याची तुलना मुल्यमापन हे होणं शक्य नाही.तरी तुलना अथवा मुल्यमापन करताना अवमूल्यन होऊ नये एवढं पथ्य तर नक्कीच पाळल गेलं पाहिजे. जगाच मुल्यमापन करताना तसेच सृष्टी वरील इतर असणार्या सर्व बाबी संदर्भात आपलं मनोगत व्यक्त करताना अथवा ज्ञान विस्तार करताना प्रत्येक व्यक्ती आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार आपल्या कुवतीनुसार जगाचं मुल्यमापन करतो .मग हे मुल्यमापन बरोबर येईल असं मुळीच नाही.येण्याच कारणं पण शेवटी प्रत्येक व्यक्ती आपल्या बौद्धिक ज्ञान कक्षा किती रूंदावल्या आहेत त्या नुसारच मत अभिप्राय नोंदवतो .आपण जितके ज्ञानी तितकंच मोठं जग आपण पाहु शकतो अथवा अनुभवु शकतो . व्यक्ति स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आपल मत भुमिका विचार मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.तो असला पाहिजे असणं गरजेचं आहे.पण आपण आपलं मत विशद करताना अथवा एखाद्या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करताना अनेक बाबींचा सांगोपांग विचार केला पाहिजे.आपल मत हे अर्धसत्य नसल पाहिजे. अर्धसत्य हे विघातक असतं त्याचा परिणाम दिर्घ काळासाठी होत असतो.आणि मांडलेले विचार व्यक्तिरेखा त्या मुळे डागाळल्या जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.महणुन सार्वजनिक पातळीवर मत हे सुयोग्य असलं पाहिजे. सुयोग्य नसेल तर मौन सर्वतम आहे.मौन हि सगळ्यात उत्तम कला आहे पण मौन कसं राहायचं म्हणून काहि तरी विवेचन करायचं हे संयुक्तिक ठरत नाही.
*गणेश खाडे*
*संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक* 9011634301

0 

Share


गणेश खाडे   संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक
Written by
गणेश खाडे संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad