व्यवाहारात दैनंदिन जीवनात व्यापारात व्यवसायात अनेक प्रकारचे लोक माणसं भेटत असतात . अनेक ज्ञानी भेटत असतात . अनेकापैकी कामाची मोजकीच भेटत असतात . आणि एवढं असूनही जेव्हा कठीण प्रसंगी केवळ ईश्वराचेच स्मरण केले जाते . इतर सर्व मार्ग बंद असतात . ती नाती श्रेष्ठ असतात जिथे मी ऐवजी आम्ही ही भावना जोपासली जाते . विनम्रता पुर्वक आचरण व्यवहार , बोलणं एक दुसर्याची किंमत करणे , आदर करणे , कृतज्ञता व्यक्त करणे , विश्वास ठेवणे ,हे गुण ज्या माणसात आहे .तो कोणाच्याही अंतःकरणात स्थान प्राप्त करतो . शेवटी आनंद एक आभास आहे , याला जो तो शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे . दुःख एक अनुभव आहे , तो आज प्रत्येकाप्रत्येकाजवळ आहे . आणि जिवनात तोच यशस्वी आहे ज्याचा स्वतावर विश्वास आहे. सोबतच ज्या माणसाचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तो जिवनात मागे कधीच राहत नाही . उदाहरणार्थ आंधळयाला मंदीरात पाहुन लोक हसले आणि म्हणाले मंदीरात दर्शन करायला आलात काय आपणास परमेश्वर दिसणार त्यावर आंधळ्याने उत्तर दिले काय फरक पडतो मी पाहील काय नाही काय माझा देव तर मला दिसणार नाही पण मी देवाला तर दिसणार . जर समस्या असेल तर ईमानदार व प्रामाणिक राहा . धन संपत्ती असेल तर साधे सरळ राहा . अधिकार पद मिळाले तर विनम्र राहा . क्रोध आला तर शांत व्हा .हेच जिवनाचे व्यवस्थापन आहे .सत्य तेव्हा नाराज होतो जेव्हा चार खोटारडे एकत्र होतात .तेव्हा प्रामाणिकपणा हारतो . ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात प्रतिमा दिसत नाही , त्याप्रमाणे अशांत मन असेल आनंद मिळणारच नाही याकरीता शांततेने समस्या सोडविणे आणि आनंद मिळविणे व समाधानी जिवन जगणे हाच जगण्याचा मंत्र आहे . याऊलट अविश्वास आहे . अविश्वास मुळे कठीण पर्वतासारखे भिंती निर्माण होतात . आणि विश्वास पर्वताच्या मध्यातुन आपला रस्ता काढतो . मोठ्यांनी दिलेला आशिर्वाद आणि आपल्यांनी दिलेल्या शुभेच्छा यांचा काही रंग नसतो .परंतु जिवनात जेव्हा ते रंग भरतात तेव्हा जिवन ... हे सुंदर बनते . जेव्हा कठीण प्रसंग मजबूत माणसाकडे येतात तेव्हा लोक विचार करतात हा कमजोर का होत नाही . याचा विश्वास तुटत का नाही . परन्तु लोकांना हे माहित नसते तो अनेकदा तुटुनच मजबूत बनला आहे . मनाला एवढं मजबुत बनवा , कोणत्याही प्रसंगी , कोणत्याही व्यवाहारामुळे मनाचा विश्वास शांती कमजोर होणार नाही , शांती भंग पावणार नाही. धन्यवाद नमस्कार *🌹🙏शुभ प्रभात🙏🌹*