तंगी तंगी आर्थिक तंगी
महागाईसमोर टाकली मी नांगी
आता हीच वेळ आता नाही तर पुन्हा नाही
टाकला व्यवसाय रस्त्यावर
भर उन्हं तानात डोक्यावर नाही छप्पर
भरभर माल संपला
घरात विचारले मला लावा हातभार
होलसेलर काढून माल विकत आणा
घरातील सदस्य म्हणाले तुम्ही कुटुंबप्रमुख !
कमवून कसेही कितीही आणा
आम्ही चुल्लूभर पैश्यात घर चालवू
पण आमचे स्टेटस नका घालवू
आपण राहतो टॉवरमध्ये लिफ्ट वॉचमन ?
बाजारपेठ , शाळा , बँक जवळ
लोक काय म्हणतील ?
काय दळभद्री व्यवसायाचे खुळ
हे लागलेत हे भिकेला !
मराठी माणसाने कसे नाकासमोर सरळ चालावे
अंथरून पाहून पाय पसरावे
जेनो काम तेनो करू बीजा करू गोता खाय
तुमच्यासोबत नाही हा आम्ही अजिबात
आम्ही तुमच्या व्यवसायात सहभागी नाही
काढून टाकाच खुळ
आठ तास चाकरीत घालवा वेळ
"हेल्थ इज वेल्थ" ठेवा लक्षात
तडजोडीत संसार करायला आम्ही तयार
तुम्हाला नाहीच जमणार जमणार
अश्याने मराठी माणूस कशी कशी प्रगती करणार ?
हवे ते उद्दिष्ट कसे सध्या करणार ?