प्रेरणादायी भाषणे ऐकून
मी गेलो भारावून !
आता नाहीतर कधीच नाही
धंद्याशिवाय पर्याय नाही
मला वाटले गेला महाराष्ट्र ?
कुठे ?नाही हो आपल्या हातातून
घाबरून जाऊन मी उचलले पाऊल
होय रस्त्यावर बसलो नोकरी सोडून
फिनाईल ,फ्लोर क्लिनर ,टॉयलेट क्लिनर ,
ब्लिचिंग पावडर, हँडवॉश ,डिशवॉश
शायनिंग पावडर ,काथ्या ,रूमफ्रेशनेर
झाले उलटेच दुकानदार म्हणाला
माझ्या दुकानासमोर नको
पुढे गेलो इंच इंच भर जागाच नाही
आगे जाव आगे जाव शेवटी घरी पोहोचलो
मुद्देमालासहित होय मुद्देमालासहीत
आयुष्यात प्रथमच स्वतःला समजलो गरीब
लोकांनीही जाणीव करून दिलीच
सोसायटीच्या वॉचमॅननेहि गेटवर अडविले
ए किधर जा रहा है ? किसको मिलना है ?
आता बोला झालो कि नाही मी गरीब
धंदा धंदा झाली पूर्ण खाज
९९% आपलीच सोसायटीतील लोक
एक फिनाईल बाटली विकत घेईनातं !
महिन्याची वीज गॅस मेंटेनंस देयके आली घरात
धंद्यामुळे ती हि भरायला परवडेनात
सुखाची नोकरी सोडून पडलो दुःखाच्या धंद्यात
आयुष्यात प्रथमच स्वतःला समजलो गरीब
जबरदस्तीने जोर लावून हिंमत करून बसलो
हफ्तेवाल्यानी शंभर रुपये घेऊन लुबाडले
तंबीही दिली रोज द्यायचे नाहीतर तोंड काळ करायचे
आता बोला एक रुपयाचा नाही झाला धंदा
हफ्तेवाल्यांची आधी पोटं भरा
कठीण कठीण होऊन बसलंय बर
हे स्वप्न होत प्रत्यक्षात काय ?
अहो कल्पना करवत नाही
प्रश्न एकच धंद्याला सुरुवात करायची कि नाही
का ? ९ ते ५ नोकरी बरि ?