नशिबाने केली थट्टा
नाही कमवू शकलो बक्कळ रगड पैका
लोकहो एक घ्या शिक्षण
करत राहा स्वतःला अपग्रेड
तरच जमुन येईल सगळं
किती वर्षे काढणार उत्पन्न दाखला
आहे तिथेच राहायचे का ?
केव्हा स्वतःच्या आलिशान कारमधून फिरणार ?
केव्हा पंचतारांकित हॉटेलात जाणार ?
जगपर्यटन शॉपिंग वगैरे आहे कि नाही आयुष्यात ?
सोडा हो या सरकारी सवलती घेणं
आपला हाथ जगन्नाथ
करा एकदा तरी स्वयंरोजगार
व्हा स्वावलंबी
मला माहितेय तुम्ही घेणार नाही मनावर
मी नाही करू शकलो आधीच मी क्लियर केलय
मग तुम्ही हा सल्ला का घ्याल मनावर