ठेऊनि हनुवटी वरी नाजूक कर,किन किनती बघ काचेचे लाल कंगन, साद घालती तुला ते अरे ये मनमोहना . 🌹मृदु कांचन काये वर कसे रूळते छान कान्हा चे मोरपीस, व्याकुळ ला जीव, तुला लागली त्याची आस .🌹 रेशीम जरी पोलके, नि कांजीवरम जरतरी सोनरंगी नेसलीस साडी,. इथे कुणी बसलीय, प्रतीक्षेत मनमोहना च्या, राधा राणी झालीय का ती कृष्ण वेडी 🌹. हसू गोड गाली,गालावर पडे तुझ्या गोड खळी,राधा कृष्ण, राधा कृष्ण,गीत गात असे, या भिरभिरणाऱ्या, थर थर णाऱ्या तरु पर्ण सळसळी 🌹सुलभा (काव्या )हनुमान वाघ 🌹२५=२=२०२४